4 संहिता विरोधात जिल्हाधिकाऱ्यालावर मोर्चा
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार फेडरेशन जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना व इतर दहा संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांवर धडक मोर्चा काढण्यात आला यात देशातील भाजप सरकारने गेल्या 100 वर्षात कामगारांनी लढून मिळवलेले 29 कामगार कायदे भाजप आणि मोदी सरकारने 2019 आणि 2020 या कोविड काळात रद्द करून 4 श्रम संहिता तयार केल्या आहेत व त्याची 21 नोव्हेंबर 2025 रोजी अद्यादेश काढून अंमलबजावणी सुरु केली आहे. या 4 श्रम संहितामुळे यापुढे एकही कामगार कायम नोकरीत राहणार नाही, सर्व नोकऱ्याचे कंत्राटीकरण होणार आहे,कामगार कायदे संपुष्टात आले आहेत, यामुळे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगाराना मालकाच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागणार आहे. ही मोदी आणि भाजप सरकारने देशातील मालकांना दिलेली मोठी गिफ्ट आहे, ज्यामध्ये यापुढे मालक कामगारांची प्रचंड पिळवणूक करणार आहे, म्हणून देशातील प्रमुख 10 संघटनानी हा देशव्यापी एक दिवसाचा संप घोषित केला. आणि याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मागण्या
=====
1) कामगार विरोधी 4 श्रम संहिता मागे घ्या.
2)रद्द केलेले 29 कामगार कायदे पुन्हा लागू करा.
3) सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांना किमान वेतन 30 हजार रुपये करा.
4)नवीन बी बी रामजी कायदा रद्द करा, मनरेगा कायदा पुन्हा लागू करून वार्षिक 200 दिवस काम आणि दररोज मजुरी किमान 800 रुपये द्या.
5) कंत्राटी कामगारांना कायम करा, कंत्राटी कामगार कायदा रद्द करा.
6)योजना कर्मचाऱ्यांना कायम करा.
7)बांधकाम कामगारांचे नोंदणी, नूतनिकरण आणि लाभ एक महिन्यात मंजूर करा.
8)1 जानेवारी 2026 रोजी बांधकाम मंडळाने बंद केलेली मागासवर्गीय विध्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती योजना चालू ठेवा.
9)ऊसतोड कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु करा.
10)यंत्रमाग उद्योगातील कामगारांना किमान वेतन, 8 तासाचे काम आणि कल्याणकारी मंडळाची घोषणा ताबडतोब करा.
11)घरेलू कामगार मंडळाला वार्षिक 100 कोटी अनुदान द्या.
12)बांधकाम मंडळावर कामगार प्रतिनिधीची ताबडतोब नियुक्ती करा.
13)मंडळाकडील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामावर ब्रेक लावा.
14)बोगस बांधकाम कामगार नोंदणी आणि लाभ देणाऱ्यावर कडक कारवाई करा.
15)औषध विक्री उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी एम आर लोकांचा मानसिक छळ करणे आणि नोकरीतून बडतर्फ/बदली करणे बंद करा.
16) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बांधकाम कामगारांचे प्रशिक्षण झाले पाहिजे
17) घरकुल बांधणीसाठी मंडळाने 5 लाख रुपये सरळ कामगारांच्या खात्यात रक्कम जमा करावी.
वरील मागण्यांची ताबडतोब दखल घेऊन अंमलबजावणी करावी तसे न झालेस आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला. कॉं. सैयद खुदबुद्दीन ( महाराष्ट्र राज्य सदस्य )कॉं. विजय पवार (जळगाव जिल्हा सेक्रेटरी )कॉं शोएब अली (बोडवड तालुका अध्यक्ष )कॉम्रेड मनिष चौधरी, कॉ. अजहर शेख, कॉ चेतन पाटील, कॉ चंपालाल पाटील,कॉ विलास राजहंस भिकन पिंजारी, सैयद कमरुद्दीन,अब्दुल रहीम,फिरोज शाह, अनवर शाह, युनूस शेख, नितीन माळी,फारुख शेख, शोएब खान, राजू भोई, मन्सूर शाह, सै अनिस,अनेक कामगार सामील होते.






