Top 5 This Week

Related Posts

आमदारांचे मदतीने अंदाजे २ वर्ष वयाच्या मादी जातीच्या बिबट्याचे वनविभागाने केले रेस्क्यू ऑपरेशन.

आमदारांचे मदतीने अंदाजे २ वर्ष वयाच्या मादी जातीच्या बिबट्याचे वनविभागाने केले रेस्क्यू ऑपरेशन.
….. ५ फुटांवरून २ डॉट नंतर २ तासात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

12 एप्रिल रोजी रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये वाघ घुसला असल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात शहरात पसरली. प्रत्यक्षात तो बिबट्या असल्याचे आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी व कार्यकर्त्यांना दिसून आले. तात्काळ घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी धाव घेतली. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दूरध्वनीद्वारे मुक्ताईनगर बस स्थानकाजवळील पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस येथे बिबट्या आढळल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर यांना प्राप्त होताच वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले . वनपाल गणेश गवळी यांनी रायफलद्वारे ५ फुटावरून बिबट्यावर दोन डॉट मारले होते. नंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः हातात काठी घेत वन विभागाच्या रेस्क्यू टीम सोबत मैदानात उतरले होते. आमदारांचे धाडस व वन कर्मचारी यांच्या मदतीने बिबट्या पायबंद झाला. पिंजऱ्या जवळ आल्यानंतरही बिबट्याने थोडा चकमा देण्याचा प्रयत्न केला होता व 2 तासाच्या अथक प्रयत्नाने बिबट्याला ट्रान्क्युलाईझ करून जेरबंद करण्यात आले आहे.
सदर कार्यवाहीत पोलिस निरीक्षक आशिष आडसूळ, पोलीस प्रशासन, इतर शासकीय विभागांच्या व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने सदर कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता बिबट्याला कोणतीही इजा झालेली आढळून आली नाही. तंदुरुस्त असून वन विभागाच्या ताब्यात असल्याचे मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कु. कृपाली शिंदे यांनी सांगितले.
सदर कार्यवाही ही वनविभाग जळगावचे उपवनसंरक्षक राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मुक्ताईनगर कृपाली शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वडोदा) परिमल साळुंखे, वडोदा वनपाल गणेश गवळी, रुईखेडा वनपाल दीपश्री जाधव, तसेच मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, सुरज बोराखडे आणि पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत लोंढे, तसेच मुक्ताईनगर व वडोदा रेंजमधील सर्व वनरक्षक व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
@@@@ मुक्ताईनगर परिसरातील सारोळा रस्ता तसेच मलकापूर रस्त्यावरील शेत शिवारात काही दिवसाआधी आढळलेल्या प्राण्याचे मॉनिटरिंग सुरु असल्याचे उपवनसंरक्षक श्री राम धोत्रे यांनी सांगितले.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles