आदिशक्ती संत मुक्ताई यात्रोत्सवास ध्वजारोहणाने उत्साहात शुभारंभ

Advertisement

मुक्ताईनगर | प्रतिनिधी……
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोथळी व मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताई यात्रोत्सवाचा 11 फेब्रुवारी रोजी पारंपरिक उत्साहात ध्वजारोहण करून शुभारंभ करण्यात आला. मंदिर परिसरात धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले होते. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यात्रोत्सवाच्या ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी भुसावळ प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार गिरीश वखारे प्रमुख उपस्थित होते. मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांचे सुपुत्र हर्षराज पाटील, कोथळी चे सरपंच नारायण चौधरी, मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष देवयानी शिरसाट, ह भ प रवींद्र हरणे महाराज, ह भ प उद्धव जुनारे महाराज , नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, निवृत्ती पाटील, पुरुषोत्तम वंजारी, पंकज राणे, विशाल सापधरे , नगरसेवक गणेश टोंगे, आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, माजी नगरसेवक निलेश शिरसाट , उमेश राणे, मंदिराचे विश्वस्त तसेच भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधीपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले आणि यात्रोत्सवाची सुरुवात झाली.

Advertisement

यानंतर मंदिरात विशेष पूजाअर्चा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त भजन-कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील काही दिवस भक्तिमय वातावरणात कार्यक्रम होणार आहेत .

यात्रोत्सवाच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी सांगितले.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here