advertisement
Home muktainagar अंतुर्ली येथे सेंट्रल बँकेच्या उप शाखाप्रमुखाच्या घरी 65 हजाराची चोरी.

अंतुर्ली येथे सेंट्रल बँकेच्या उप शाखाप्रमुखाच्या घरी 65 हजाराची चोरी.

0

संदीप जोगी… मुक्ताईनगर…….

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील शिक्षक कॉलनी मध्ये राहणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे सहाय्यक प्रबंधक यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील 65 हजाराचे सोन्याचे दागिने लांबवण्याची घटना सहा डिसेंबर रोजी सायंकाळ नंतर घडली. अंतुर्ली गावात अन्य चार ठिकाणी सुद्धा घरफोडी झाल्याचे वृत्त आहे.
अंतुरली येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक प्रबंधक विशाल रमेश तायडे हे सहा डिसेंबर रोजी सायंकाळी वरणगाव येथे नातेवाईक यांच्याकडे गेलेले होते. सात डिसेंबर रोजी त्यांना घरमालक रवींद्र सोनवणे यांनी फोन करून सांगितले की तुमचे घराचे दरवाजचे कुलूप तुटून पडलेले असल्याचे दिसून येत आहे. तायडे यांनी अंतुरली येथे घरी येत पाहणी केली असता घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे त्यांना दिसून आले. कपाटातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच तीन ग्रॅम वजनाचे धम्मचक्र असलेले सोन्याचे पेंडल असा एकूण 65 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी विशाल तायडे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुरेश मेढे करीत आहे.

Exit mobile version