दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी मलकापूर तालुक्यातील नरवेल मंडळातील मौजे दसरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास समाधान सोनवणे तहसीलदार मलकापूर, प्रवीण घोटकर नायब तहसीलदार मलकापूर धनश्री हरणे निरीक्षण अधिकारी मलकापूर सूर्यवंशी तालुका कृषी अधिकारी, चेतन शेंबेकर पशुधन विकास अधिकारी दसरखेड शशिकांत वानखडे मंडळ अधिकारी, कुलवंतसिंग राजपूत मंडळ अधिकारी मलकापूर राहुल खर्चे तलाठी सुपे मॅडम पर्यवेक्षक एकात्मिक बालविकास प्रकल्प, निंबोळे मॅडम ग्रामसेवक दसरखेड, विजय साठे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर, श्रावण पाटील रास्त भाव दुकानदार दसरखेड तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर शिबिरामध्ये विविध संबंधित विभागाचे योजनांची माहिती देण्यात आली तसेच महसूल विभाग व इतर विभागाचे दाखले वितरण करण्यात आले. दसरखेड येथील शेतकरी पंढरी डोसे यांना कृषी विभागाकडून प्राप्त झालेले ट्रॅक्टरची चावी तहसीलदार मलकापूर यांची हस्ते देण्यात आली. सदर शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
मलकापूर तालुक्यातील नरवेल मंडळातील मौजे दसरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन
Advertisement
Subscribe to Viral News Live






