संदीप जोगी मुक्ताईनगर…..
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकी प्रचारामध्ये केंद्रीय क्रीडा युवक राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री ,राज्याचे ४ कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे आमदार तसेच राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले होते.
मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक हाय प्रोफाईल झालेली असून यामध्ये आता कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपंचायतीवर फडकतो हे निवडणूक निकालांती स्पष्ट होईलच.
शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करी राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारामध्ये जोर धरला होता. शेवटी हा मतदार राजा आहे त्याचे मनातील हालचाली काय हे जाणकारही जाणू शकत नाही. विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील शिंदे गट शिवसेना पक्षाकडून तर भाजपाकडून माजी सरपंच ललित महाजन यांच्या पत्नी भावना महाजन निवडणूक रिंगणात आहे. दोनच उमेदवार असल्याने येथे मोठी चुरस वाढली असून शेवटी राजकीय सामाजिक मतांची बेरीज वजाबाकी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घालते तसेच किंग मेकर च्या भूमिकेत पडद्यामागून सुरू असलेली राजकीय गुगली कोणत्या दिशेने फिरते हे पण समजेलच. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.





