आठ दिवसांत रुग्णालयाची परीस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून ‘तालाठोको आंदोलनाचा” शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा
मलकापुर:- मलकापुर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी,डॉक्टरांकडून जनतेला चुकीची वागणूक तसेच डिलेव्हरी पेशंट, किरकोळ तपासणी करता सुद्धा बुलढाण्याला रेफर करण्याची पद्धत बंद व्हावी यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन गजानन ठोसर, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण “रेफर टू बुलढाणा रुग्णालय “असे करुन गजानन ठोसर यांनी फित कापून उद्घाटन केले व आठ दिवसांत रुग्णालयाची परीस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा गजानन ठोसर यांनी दिला.
उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी साठी रुग्ण आले असता रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध राहत नसल्याची बाब अनेक वेळा समोर आली आहे,असाच प्रकार शनिवार दि.08 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता घडला मलकापूर शहरातील दोन डिलिव्हरी चे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरी साठी आले स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना फोन लावला मात्र दोन तास उलटून सुद्धा डॉ.आले नाही याबाबतची माहिती नातेवाईकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिली,माहिती मिळताच ठोसर यांनी रुग्णालयात धाव घेऊन उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर यांना भ्रमणध्वनीहून याची माहिती दिली, डॉक्टरांनी स्त्री रोग तज्ञ येत असल्याचे सांगून मात्र रात्री अकरा वाजे दरम्यान नेत्ररोग तज्ञ डॉ. क्षिरसागर आले, यावेळी उपस्थित कर्मचार्यांनी पेशंटची बीपी वाढलेली असल्याने पेशंटला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे हलविण्याचा सल्ला दिला… बाळाची ही तब्येत नाजूक असून पेशंट बुलढाणा पर्यंत पोहोचणार नसल्याचेही भीती दाखवली, खाजगी रुग्णालयात नेऊन बीपी नॉर्मल करून सिझर डिलिव्हरी झाली, पेशंटला तिस हजारांचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला, असा हा प्रकार दररोजचा झाल्याने आज सोमवार रोजी शिवसेना (उबाठा)च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण “रेफर टू बुलढाणा रुग्णालय” असे करण्यात आले, आलेल्या रुग्णांना नानाविध कारणे सांगून रेफर टू बुलढाणा केले जाते सदर उपजिल्हा रुग्णालय गोरगरिब रुग्णांच्या सेवेत साठी नसून धनदांडग्या डॉक्टरांना उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य होत असल्याचा व कर्मचाऱ्यांना, डॉ.ना कमीशन मिळत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केला आहे, उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आठ दिवसात न सुधारल्यास या रुग्णालयाची तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी रक्तपेढी सुरू करुन सोनोग्राफी तज्ञांची नियुक्ती करावी ,डॉक्टरांनी नियमितपणे जनतेचा उपचार करण्यासाठी उपस्थित राहावे दवाखान्यातील बिघाड असलेल्या मशिनरी लवकरात लवकर सुरू करून जनतेच्या सेवेत कार्यान्वित कराव्या अशा विविध मागण्यांसाठी (उबाठा) शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज एल्गार केला यावेळी पोलीसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. या नामकरण आंदोलनात शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, वाहतूक सेना शहरप्रमुख इमरान लकी, किसान सेना उपतालुकाप्रमुख गजानन मेहेंगे, माजी न.प उपाध्यक्ष महादेव वनारे, माजी नगरसेवक पांडुरंग चीम, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,राजू नेवे,शेख कलीम,ढोलकर, शेख नासीर शेख उस्मान, सै.सोहील निजाम, विजय झांबरे, समीर खान, शेख मोहसिन, जाफरभाई, ईमामशाह,हरीदास शिंदे, चेतन कहाते, कृष्णा चोपडे,वसीम लकी, वसीम जमादार, उखर्डा तांदूळकर, दीपक कोथळकर,सै.अकरम मूर्गीवाले,जाफर पटेल, शेख असलम बागवान,
समीर खान टेलर,
मो अशफाक, एजाज खान, शेख रफिक शेख नबी, शेख एजाज, शेख समीर सह आदींची उपस्थिती होती.






