वॉइस ऑफ मीडिया बुलडाणा उर्दू विंगचा पदवितरण सोहळा पिंपळगाव राजा येथे उत्साहात

Advertisement

पिंपळगाव राजा : वॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या वतीने आयोजित पदवितरण सोहळा पिंपळगाव राजा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या सोहळ्यात बुलडाणा जिल्हा अध्यक्ष जफर खान अतहर खान आणि बुलडाणा जिल्हा सचिव शेख सरदार शेख कादिर यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिस्तबद्ध आणि औपचारिक पद्धतीने करण्यात आले.
मोहम्मद तौसीफ मोहम्मद शफीक यांची बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच शेख रफीक शेख करीम यांची जळगाव जामोद तालुका अध्यक्ष तर शेख राजिक शेख रहीम यांची नांदुरा तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेच्या मूल्याधारित पत्रकारितेला बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला. वॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या माध्यमातून जिल्ह्यात रचनात्मक आणि जबाबदार पत्रकारितेचा संदेश पोहोचवण्याचे उद्दिष्ट यावेळी मांडण्यात आले.

Subscribe to Viral News Live