वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन

Advertisement

नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक येथे 26 जानेवारी तिरंगा ध्वजारोहणाच्या दिनाच्या दिवशी झालेल्या शासकीय कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेता टाळले हा प्रकार केवळ सुख चूक किंवा विसर नसून हा संविधानाचा बाबासाहेबांचा व संपूर्ण आंबेडकरी समाजाचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे या अन्यायकारक व अपमानास्पद कृत्याविरोधात वनविभागातील कर्मचारी माधवी जाधव व दर्शना सापुरे या भगिनींनी कार्यक्रमास्थळी निर्भीडपणे आवाज उठून जाब विचारला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळेच आज देशात संविधान लोकशाही समानता व स्वातंत्र्य अबाधित आहे अशा महामानवाचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न घेणे म्हणजे संविधानाचा अपमान दलित वंचित समाजाचा अपमान आणि कोट्यावधी आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावणारा प्रकार होय हा प्रकार महाराष्ट्रातील समस्त आंबेडकरी जनता बौद्ध समाज संविधान प्रेमी नागरिक व पुरोगामी विचारसरणी मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस अत्यंत वेदनादायक व संताप जनक आहे त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील संघटना बौद्ध समाज बांधव विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व संविधान प्रेमी नागरिक यांच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करून त्यांचे वर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्यानुसार व भारतीय दंड संहिता कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीप पोहेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गिरीश वखारे व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रसंगी संजय धुंदले, सुभाष शिरसोदे, प्रमोद पोहेकर ,राजू पानपाटील, संजय म्हसाने, मनोज पोहेकर, पवन वानखेडे राहुल वाघ, योगेश शिरसोदे अमर शिरसोदे, रवींद्र चव्हाण भागवत चव्हाण, भगवान वाघ ,गोपाळ धुंदले ,महेंद्र शिरसोदे, संध्या हिरोळे
आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here