रावेर तालुक्यातील निंबोल परिसरात सट्ट्यासोबत पत्त्याच्या क्लब जोरात चालू याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यावर कारवाई होईल का?
लेखणी शस्त्र रावेर तालुका प्रतिनिधी-
विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील निंबोल गावातील परिसरात बऱ्याच दिवसापासून अवैद्य धंदे तसेच विनापरवाना पत्त्याचे क्लब जोरात चालू आहे. याकडे संबंधित पोलीस प्रशासन त्वरित लक्ष देईल का असा सवाल गावातील नागरिकांकडून होत आहेत.
तसेच गावातील पन्नी दारू सध्या तरी पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बंद करण्यात आलेली आहे. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे गावकऱ्यांच्या वतीने कौतुक होत आहेत, परंतु इकडे सट्टा क्लब मात्र जोरात चालू आहे. हा क्लब कायमचा बंद करण्याची मागणी मात्र होत आहेत. तसेच निंबोल परिसरातील सट्टा क्लब आठ दिवसाच्या आत जर का बंद झाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसे लेखी स्वरूपाचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल याची प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहेत.
रावेर तालुक्यातील निंबोल परिसरात सट्ट्यासोबत पत्त्याच्या क्लब जोरात चालू याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष यावर कारवाई होईल का?
Advertisement
Subscribe to Viral News Live





