मलकापूर :
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वंचित-बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असून हे वक्तव्य मनुवादी विचारसरणीचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संविधानविरोधी आचरण केल्याबद्दल गिरीश महाजन यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विजय महादेव झनके यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख उपस्थिती यशवंतराव कळाशे जि उपाध्यक्ष भाऊराव उमाळे जि संघटक जि एन इंगळे सर भारतीय बौध्द महासभा ता अध्यक्ष एस एस वले सर भारतीय बौध्द महासभा प्रभारी जळगाव जामोद ता. एस बी निकम विश्र्वनाथ गाडेकर समता सैनिक दल डिव्हिजन ऑफिसर एस बी निकम भारतीय बौध्द महासभा राजु भाऊ शेगोकार रामराव गवई नारायण जाधव उपस्थित होते
या संदर्भात वंचित बहुजन आघाडी *फुले-आंबेडकर विचारवंत सभा*, *भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन युवक व महिला आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, मलकापुर* (*जि. बुलढाणा*) *यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले*
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या विचारांवरच देशाची लोकशाही उभी आहे. मात्र गिरीश महाजन यांनी केलेले वक्तव्य हे संविधानविरोधी, बहुजनविरोधी व मनुवादी मानसिकता दर्शवणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा व्यक्तीस मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे मत अध्यक्ष विजय महादेव झनके यांनी व्यक्त केले.*
गिरीश महाजन यांना तत्काळ मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कठोर कारवाई करावी व आमदारकी रद्द करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडी महासचिव गणेश सावळे धम्मपाल उमाळे ता सचिव मधुकर निकम मोहन गवई संघपाल तायडे उपाध्यक्ष दिलीप वाघअनिल तायडे नरसिंग चव्हाण सल्लागार गजानन झनके संघटक प्रविण इंगळे सल्लागार विनोद निकम जनार्दन इंगळे संजय झनके अमित झनके कडु कोंगळे प्रदिप वानखेडे धनराज वाघ संजय मोरे व्हि एस रायपुरे अनंता उमाळे प्रकाश सिरसाठ वनसिंग चव्हाण संतोष निकम संभाजी सहावे सतिश वाघ शामराव गवई प्रफुल गवई सुरेश गायकवाड विलास तायडे देवचंद दोडे बि जे वानखेडे कैलास बाविसआणे आनंदा वाकोडे रामदास खराटे जानराव फुलपगारे रामा खराटे असंख्य कायकर्ते उपस्थित होते.






