न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबरची मतमोजणी आता २१ डिसेंबरला

Advertisement

मलकापूर तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आयोगाच्या ०४ नोव्हेंबर २०२५ च्या कार्यक्रमानुसार ०२ डिसेंबरला मतदान व ०३ डिसेंबरला मतमोजणी नियोजित होती, तसेच न्यायालयीन अपील दाखल झालेल्या संस्थांसाठी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सुधारीत कार्यक्रम जाहीर करून २० डिसेंबरला मतदान व २१ डिसेंबरला मतमोजणी निश्चित करण्यात आली होती; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिका क्रमांक WP/७५०८/२०२५ वरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आदेश दिल्यामुळे ०३ डिसेंबरची मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून ती सुधारीत कार्यक्रमातील नियोजित दिवशी म्हणजेच २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे; या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ईव्हिएमची सुरक्षित हाताळणी, साठवणूक, सुरक्षा व्यवस्थापन, सीसीटीव्ही व इतर उपकरणांची कार्यस्थिती, गोडाऊनसाठी जबाबदार अधिकारी नियुक्ती, २४ तास सशस्त्र सुरक्षा, प्रवेश नोंदवही, मतदानानंतर स्विच बंद असल्याची खात्री, आवश्यकता भासल्यास लो बॅटरी स्थितीत नियमांनुसार कार्यवाही, तसेच उमेदवार व पक्ष प्रतिनिधींना गोडाऊन पाहणीची सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया नियमांनुसार पार पाडून त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Subscribe to Viral News Live