मुक्ताईनगर । प्रतिनिधी
दिव्यांग बंधू आणि भगिनींना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक पत्र क्र.विसयो २०२४/प्रक्र ४/विसयो ०९/१०/२०२५ पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार तहसील कार्यालय मुक्ताईनगर च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांचे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभ मंजूर झालेले आहेत आणि लाभ सुरू आहेत अशा लाभार्थ्यांनी आपले मूळ दिव्यांगाचे प्रमाणपत्र, युडिआयडि कार्ड, आधार कार्ड आणि संजय गांधी योजना किंवा श्रावणबाळ योजनेचा शिक्का असलेले बँकेचे पासबुक आणि या सर्वाचे एक झेरॉक्स सेट घेऊन त्यावर आपला मोबाईल क्रमांक नमूद करून तलाठी कार्यालय मुक्ताईनगर किंवा संजय गांधी शाखा तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे दि. १९ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत आपले दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे व महसूल सहाय्यक अधिकारी कैलास पाटील यांनी केलेले आहे.





