रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारातील हतनूर कालव्याची माती अनधिकृतपणे उत्खनन करून विक्री केल्याबाबत आ एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात
तारांकित प्रश्न उपस्थित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली
यावेळी ते म्हणाले
रावेर तालुक्यातील तासखेडा शिवारातील हतनूर कालव्याची माती अनधिकृतपणे उत्खनन करून विक्री करण्यात आली आहे याप्रकरणी संबंधित दोषींविरुध्द कारवाई होणे संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २९
सप्टेंबर, २०२५ रोजी वा त्यादरम्यान जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे पत्रव्यवहार केला आहे
उपरोक्त प्रकरणी शासनाने काय चौकशी केली याची माहिती देण्यात यावी तसेच चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने हतनूर कालव्यातील मातीचे अवैध उत्खनन प्रकरणी संबंधित दोषींविरुध्द कोणती कारवाई केली वा करण्यात आली याची माहिती देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली
सदर प्रश्नाला महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले ते म्हणाले उपरोक्त प्रकरणी
स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २९
सप्टेंबर, २०२५ रोजी वा त्यादरम्यान जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे पत्रव्यवहार केला असून
तासखेडा शिवारातील हतनूर धरण कालव्यातील मातीचे अवैध उत्खनन / वाहतूक प्रकरणी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, सावदा व क्षेत्रिय महसूल यंत्रणा
यांचेमार्फत स्थानिक संयुक्त चौकशी करुन पंचासमक्ष पंचनामा केला आहे .हतनूर कालव्याच्या खोदकामामधून निघालेली अतिरिक्त माती कालव्याच्या लगत संपादित क्षेत्रामध्ये साठवून ठेवण्यात आली आहे. त्यापैकी एकूण ४५६५ ब्रास मातीची अवैध वाहतूक अज्ञात
व्यक्तीव्दारे झाल्याबाबत उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सावदा यांनी तहसिलदार रावेर
यांना कळविले आहे. सदरील मालमत्ता ही जलसंपदा विभागाच्या मालकीची असल्याने उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सावदा यांना प्रस्तुत प्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत दिनांक
२०/११/२०२५ च्या पत्रान्वये सहायक पोलीस निरीक्षक, सावदा यांना कळविले आहे. त्यानुसार अनधिकृत उत्खनन कोणी केले, हे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणी नियमानुसार संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
तासखेडा येथील हतनूर कालव्याची माती अनधिकृतपणे उत्खनन करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी – आ एकनाथराव खडसे
Advertisement
Subscribe to Viral News Live




