जळगांव जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात केली यावेळी
आ .एकनाथराव खडसे म्हणाले
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, एरंडोल, चाळीसगांव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर या सात तालुक्यांतील मानवविकास निर्देशांक कमी असून या तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत बसेस पुरविण्यात आल्या आहेत हे खरे आहे का
मानव विकास कार्यक्रमांतर्गत जळगांव जिल्ह्यातील उपरोक्त सात तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांकरीता वाहतुकीसाठी किमान १०० बसेसची मागणी असताना अद्यापपर्यंत फक्त ४९ बसेस पुरविण्यात आल्या आहेत
हे खरे आहे का?
असल्यास, जळगाव जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचाविण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरीता वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता अतिरिक्त बसेस पुरविण्याची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत असल्याची माहिती द्यावी तसेच अतिरिक्त बस पुरवण्यात याव्यात अशी मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
सदर प्रश्नास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना सांगितले शासन निर्णय दिनांक १९ जुलै, २०११ व शासन निर्णय दिनांक २७ मार्च, २०१४ अन्वये मानव विकास कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, एरंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर या सात तालुक्यात शालेय विद्यार्थीनीकरीता बसेस पुरविण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त बसची मागणी नसुन अतिरिक्त बस मागणीचा
प्रस्ताव आल्यास अतिरिक्त बस पुरवण्या बाबत निर्णय घेण्यात येईल असे अजित पवार यांनी सांगितले
जळगांव जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करुन देण्यात याव्यात आ एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी
Advertisement
Subscribe to Viral News Live





