Thursday, January 15, 2026
HomeAmravatiअमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द

3 ते 18 डिसेंबर, मतदार यादीवर आक्षेप व हरकती नोंदविण्याचा कालावधी

अमरावती, दि. 03 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघांसाठी दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी (De-nova Electoral Roll) तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे. मतदार यादीची प्रत विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तहसील स्तरावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

मतदार नोंदणी अधिनियम, 1960 नुसार या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे आखण्यात आले आहे. त्यानुसार हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई दि. 28 नोव्हेंबर, 2025 रोजी करण्यात आली आहे. तसेच आज दि. 3 डिसेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत, मतदार याद्यांवर दि. 3 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच दावे व हरकती 5 जानेवारी 2026 रोजी निकाली काढण्यात येतील. याच दिवशी पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे. उक्त दावे व हरकतीचा कालावधी संपल्यानंतर दि. 12 जानेवारी 2026 रोजी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल.

मतदार नोंदणी अधिनियम 1960 मधील नमूना 5 नुसार प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीची सूचना प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. तसेच मतदार नोंदणीमध्ये अद्याप पात्र शिक्षक नाव नोंदणी करण्याचे कोणी राहीले असल्यास किंवा इच्छुक असल्यास अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये नोंदणी करु शकतात, असे विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार दि. 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर 2025 या दरम्यान अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार यांच्या स्तरावर अर्ज स्वीकृत करण्यात आले आहे. सदर अर्जांची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे – 

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Viral News Live – Daily Newspaper Editor-in-Chief: Zafar Khan Athar Khan Registration Number: MHBIL/25/A1327
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments