Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगर येथे अमरावती व मुंबई येथील जिल्हा न्यायाधीश यांची सदिच्छा भेट.

मुक्ताईनगर येथे अमरावती व मुंबई येथील जिल्हा न्यायाधीश यांची सदिच्छा भेट.
….. वकील संघाकडून न्यायाधीशांचे स्वागत.

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. मुक्ताईनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून सेवा बजावलेले न्यायाधीश सत्यवान डोके व न्यायाधीश आर. एम. तुवर यांनी 21 मार्च 2026 रोजी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट देत त्यांचा मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्ताईनगर वकील संघ च्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रसंगी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, मुक्ताईनगर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अरुण कांडेलकर , सचिव ॲड . ललित पुजारी , ॲड. अरविंद गोसावी, ॲड. विनोद इंगळे, ॲड. संतोष इंगळे, ॲड. संतोष कलंत्री, ॲड. तुषार पटेल, ॲड. असिफ आझाद, ॲड. उमेश जवरे, ॲड. रमेश हगे , ॲड. देवेंद्र बोदडे यांचेसह सामाजिक कार्यकर्ते दिनेश कदम, दिलीप पाटील सर, कमलेश जैन, पत्रकार संदीप जोगी, राजेश चौधरी, रवींद्र पवार उपस्थित होते.
न्यायाधीश सत्यवान डोके हे दर्यापूर अमरावती येथे जिल्हा न्यायाधीश तर न्यायाधीश आर. एम. तुवर हे सिटी सिविल कोर्ट सीएसटी मुंबई येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
मुक्ताईनगर वकील संघाचे पदाधिकारी यांच्यासोबत दोन्ही न्यायाधीश यांनी मनमोकळेपणाने चर्चा करीत सर्वांची विचारपूस केली.

Sandeep Jogi
Sandeep Jogihttps://viralnewslive.in/
Sandeep Jogi is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here. Mobile: 94216 39595

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles