Top 5 This Week

Related Posts

मिशन परिवर्तन अंतर्गत देऊळगाव राजा येथे गांजाची अवैध लागवड उघड; 3.85 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

देऊळगाव राजा (बुलढाणा) : viral news live
जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांनी मोठी कारवाई करत देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतातून गांजाची अवैध लागवड व साठवणूक उघडकीस आणली आहे. या कारवाईत एकूण 3 लाख 85 हजार 100 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी जिल्ह्यात गांजा व तत्सम अंमली पदार्थांची लागवड, वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत होती.

दि. 15 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, देऊळगाव राजा हद्दीतील ग्राम मेव्हणा राजा शिवारात विष्णु सुखदेव बोरुडे (वय 39 वर्षे, रा. मेव्हणा राजा) याने त्याच्या मालकीच्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करून विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केली आहे. या माहितीच्या आधारे पंचासमक्ष छापा टाकण्यात आला असता, तुरीच्या उभ्या पिकामध्ये गांजाची लागवड व साठवणूक केल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून 28 किलो 51 ग्रॅम ओलसर गांजाची झाडे किंमत 2 लाख 85 हजार 100 रुपये तसेच 4 किलो 700 ग्रॅम सुकलेला गांजा किंमत 94 हजार रुपये असा एकूण 3 लाख 85 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी विष्णु सुखदेव बोरुडे याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, कलम 20 (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) व अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles