Buldhana: जिल्ह्यात दहा नगरपरिषद निवडणुकीत 69.42 टक्के मतदान; सिंदखेड राजात विक्रमी प्रतिसाद

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क 5
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क 5
Advertisement

Buldhana: जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत 69.42 टक्के मतदानाची नोंद झाली असून एकूण 3,10,690 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत 504 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. मतदान प्रक्रियेत 1,48,293 महिला, 1,68,293 पुरुष आणि पाच इतर मतदारांनी सहभाग नोंदवला. नगरपरिषदनिहाय मतदानात बुलढाणा 54.20 टक्के, चिखली 71.02 टक्के, जळगाव जामोद 67.87 टक्के, खामगाव 70.65 टक्के, लोणार 72.26 टक्के, मलकापूर 74.04 टक्के, मेहकर 74.41 टक्के, नांदुरा 74.59 टक्के, शेगाव 68.98 टक्के तर सिंदखेड राजा 85.08 टक्के मतदानासह अव्वल ठरले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या काही अनुचित प्रकारांची जिल्हा प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आवश्यक कारवाई केली. संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सतत लक्ष ठेवत मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात असून सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.

Subscribe to Viral News Live