पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरचा गौरव!

Advertisement
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरचा गौरव!
 मेकॅनिकल विभागातील राकेश यांची भारतीय रेल्वेत ‘सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक’ आणि ‘सहाय्यक लोको पायलट’ पदावर निवड*
(प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते भव्य सत्कार) 
मलकापूर: पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी राकेश भास्कर मालठाने आपल्या चिकाटी, परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर भारतीय रेल्वेत दुहेरी यश संपादन करत महाविद्यालयाचा आणि संस्थेचा लौकिक अधिक उज्ज्वल केला आहे. राकेशची ‘सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तसेच ‘सहाय्यक लोको पायलट या दोन्ही प्रतिष्ठित पदांसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशाचा सत्कार प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. संतोष शेकोकर, प्रा. दीपक खारात, तसेच प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी राकेशच्या यशाबद्दल शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिर्वाद दिले.
प्राचार्य डॉ. खर्चे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सांगितले की, “राकेशसारखे विद्यार्थी हे संस्थेच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहेत. त्यांनी मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश मिळवले असून, त्यांचे उदाहरण भावी अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” राकेशने आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “महाविद्यालयातील प्रयोगशाळांमधील अनुभव, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच मला रेल्वेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत निवड होऊ शकली. हे यश माझ्या विभागाचे आणि महाविद्यालयाचे आहे.”
या प्रसंगी संपूर्ण महाविद्यालय, मलकापूर परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणेची नवी ऊर्जा निर्माण झाली असून, राकेशचे हे यश भावी अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
Subscribe to Viral News Live