Top 5 This Week

Related Posts

BBC Sportswoman of the Year 2025 Awards सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची उपस्थिती; महिला क्रीडा सक्षमीकरणाला चालना

नवी दिल्ली केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी BBC Sportswoman of the Year 2025 Awards पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून देशातील महिला खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. या प्रेरणादायी सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना रक्षाताई खडसे म्हणाल्या, “महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी आणि सक्षम व्यासपीठ दिल्यास देश अधिक उंची गाठू शकतो. आज भारतीय महिला खेळाडू जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत.” महिला क्रीडापटूंच्या यशाचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण आणि क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ASMITA लीगसारख्या उपक्रमांद्वारे तसेच राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम 2025 च्या माध्यमातून अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि सक्षम क्रीडा परिसंस्था उभारण्याचा केंद्र सरकारचा निर्धार अधिक बळकट झाला आहे.

या कार्यक्रमास खासदार राजीव शुक्ला, रंजीत रंजन, राजीव राय, राहुल कसवान, तसेच Jonathan Munro (CEO, BBC News), रूपा झा, दिलीप तिर्की, लिएंडर पेस, अंजू बॉबी जॉर्ज, दीपा मलिक आणि योगेश्वर दत्त यांच्यासह देशभरातील आघाडीचे खेळाडू, क्रीडा प्रशासक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारत ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करत असताना, क्रीडा क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, आत्मविश्वास आणि यश हे राष्ट्रीय अभिमान व प्रगतीसाठी प्रभावी प्रेरणाशक्ती ठरेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.

Atiq Bilal Khan
Atiq Bilal Khanhttps://viralnewslive.in/
Atiq Bilal Khan is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here.Name: Atiq Bilal Khan Designation: Khandesh Divisional Editor Location: Seed Farm, Muktainagar, District Jalgaon (Khandesh) Phone: 9325146187

Popular Articles