मुक्ताईनगर… मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली शिवारातील तापी नदी पात्राजवळ अवैधरित्या गौण खनिजाची चोरी करताना आढळून आल्याने चालकासह दोघांविरुद्ध तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून 17 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतरली शिवारामध्ये ट्रॅक्टर क्रमांक एम एच 19 ए एन 05 35 वरील चालकाने ट्रॉली मधील वाळू खाली करून घेऊन जात असताना तहसीलदार गिरीश वखारे व त्यांच्या पथकाने ट्रॅक्टर पकडले ट्रॅक्टर चालक तेथून पडून गेला. त्या ठिकाणी संजय तुकाराम धनगर, मुकेश धनगर दोघे राहणार नरवेल तालुका मुक्ताईनगर हे दोघे आले. त्यांनी पथकाला मी अँटि करप्शन संघटनेचा अध्यक्ष आहे. अशी भीती दाखवून ट्रॅक्टर वर कारवाई करू नका असे धमकावून तेथून दोघे निघून गेले. याप्रकरणी तहसीलदार गिरीश वखारे यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तिघां विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 413/25 bns कलम 303(2),62 तसेच महाराष्ट्र महसूल संहिता कलम 48(7),48(8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली पोहेका राजकुमार चव्हाण करीत आहे.
अंतुर्ली शिवारामध्ये अवैध गौण खनिजाची चोरी करणाऱ्या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल .
Advertisement
Subscribe to Viral News Live





