श्रीक्षेत्र मुक्ताईनगरात भाविकांची कार्तिक वारी —संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर
मिशन परिवर्तनची प्रभावी मोहीम : जळगांव जामोद हद्दीत पाच किलोहून अधिक गांजा जप्त; एक इसम अटकेत
बुलढाणा जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगांव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची मोठी कारवाई केली. मिशन परिवर्तन अंतर्गत करण्यात आलेल्या या तपासात पोलिसांनी एका इसमाला पकडत त्याच्या ताब्यातून पाच किलो बहेचाळीस ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी पोनि सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जळगांव जामोद परिसरात गस्त करीत असताना ग्राम पळशी फाटा येथे संशयास्पद हालचाली करणारा एक इसम दिसला. स्टाफने त्याला थांबवून त्याच्या हातातील थैलीची झडती घेतली असता त्यात अवैध गांजा सापडला. सदर इसम अवैध अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन जळगांव जामोद यांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अक्षय तेजराव कोकाटे, वय 32 वर्षे, रा. पळशी सुपो, ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा असे आहे. त्याच्या ताब्यातून पाच किलो बहेचाळीस ग्रॅम गांजा, किंमत एक लाख आठशे चाळीस रुपये, तसेच दहा हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यात 26 जून 2025 पासून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ विरोधी मिशन परिवर्तनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई एसपी निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तर अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगांव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोनि सुनिल अंबुलकर, पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, राजेंद्र टेकाळे, शेख चांद, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले, चापोना सुरेश भिसे, निवृत्ती पुंड तसेच पोहेकॉ राजु आडवे यांच्या तांत्रिक विभागाच्या मदतीचा समावेश होता.
शेती औजारे चोरी प्रकरण उकल; आरोपी दोघे जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील शेती औजारे व शेतीमाल चोरी प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत, स्थानिक गुन्हे शाखेने अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन स्वतंत्र गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या तपासात दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान, पोनि. सुनिल अंबुलकर यांनी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करून चोरी प्रकरणांमधील आरोपींचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या. पथकांनी सखोल माहिती गोळा करून दि. 31 ऑक्टोबर रोजी दोन्ही प्रकरणांची उकल साधली. अटक केलेल्या आरोपींकडे चोरीस गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली, रोटावेटर तसेच ट्रॅक्टर असा एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अंढेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रकरणाची हकीकत
दि. 2 ऑक्टोबर 2025 रोजी पवन शिवदास चेके, रा. सरंबा यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की त्यांच्या शेतातून शेंदऱ्या रंगाची ट्रॉली चोरून नेण्यात आली आहे. या प्रकरणी अप.क्र. 281/2025 नोंद आहे. तसेच दि. 13 जून 2025 रोजी विकास संपत चेके यांच्या गोठ्यातून रोटावेटर चोरीला गेले होते, ज्याबाबत अप.क्र. 170/2025 प्रमाणे गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही प्रकरणांचा समांतर तपास करून आरोपींचा शोध लावला.
अटक आरोपी
- गणेश आत्माराम वायाळ, वय 38 वर्षे, रा. सावरखेडा, ता. जाफ्राबाद, जि. जालना
- अमोल सुरेश शेवत्रे, वय 33 वर्षे, रा. ब्रम्हपुरी, ता. जाफ्राबाद, जि. जालना
अटक दिनांक : 31 ऑक्टोबर 2025
जप्त मुद्देमाल
- ट्रॅक्टर ट्रॉली : किंमत 75,000 रुपये
- रोटावेटर : किंमत 65,000 रुपये
- ट्रॅक्टर : किंमत 5,50,000 रुपये
एकूण जप्त मालकिंमत : 6,90,000 रुपये
मार्गदर्शन व कामगिरी पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने तर अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोनि. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली ASI ओमप्रकाश सावळे, दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, दीपक वायाळ, मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील कैलास ठोंबरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
भोटा येथे शिवछत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार
कोलते महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस यानिमित्त यूनिटी मार्च कार्यक्रम उत्साहात साजरा
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त बुलढाणा पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटीचा उत्साहपूर्ण उपक्रम
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधत बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सात वाजता जिल्ह्यातील सर्व तेहतीस पोलीस स्टेशन तसेच पोलीस मुख्यालय येथे रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देण्यात आली. या निमित्ताने एकता, अखंडता आणि सुरक्षिततेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मार्गदर्शन करत राष्ट्रभावना दृढ करण्याचे आवाहन केले. बँड पथकाने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. त्यानंतर रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटी या उपक्रमांना प्रारंभ झाला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत हा उपक्रम सुरक्षित मार्गाने आणि आरोग्यविषयक सर्व काळजी घेत यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये पुरुष गटात अजय नरोटे, सुरज गवई आणि रणजीत राठोड यांचा सन्मान करण्यात आला. महिला गटात प्रगती राऊत, मृणाल पडोळसे आणि कृष्णाली देशपांडे तर पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील दिलीप तिडके, अजाबराव आखरे आणि सुरेश शिंबरे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सम्यक जैन, सिध्दी सोनोने आणि अनिता कापरे यांना प्रोत्साहनपर ट्रॉफी देण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रम पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, प्र. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण पावरा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक काकिवपुरे, राखीव पोलीस निरीक्षक दिलीप तिडके आणि सपोनि दिपक ढोमणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमात जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी, गृहरक्षक दल, एनसीसी कॅडेट, एनएसएस विद्यार्थी, विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, आरोग्यविषयक जागृती करणाऱ्या क्लबचे सदस्य, व्यापारी संघटना, पत्रकार संघटना तसेच विविध प्रशासकीय विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय एकता दिवसाच्या शपथेसह एकात्मतेचा संदेश देत रन फॉर युनिटी आणि वॉक फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश रत्नपारखी यांनी केले.

















