संदीप जोगी मुक्ताईनगर…..
सर्व राजकीय पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत तिच्या पंचवार्षिक निवडणूक केला प्रक्रियेला सुरुवात झालेली असून दहा नोव्हेंबर रोजी नाम निर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष तसेच राजकीय पक्ष ची चांगलीच कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायती च्या निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला आरक्षित असून शहरांमध्ये 17 प्रभाग आहेत. गेल्या आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर पंचायत च्या निवडणुकीचा बिगुल वाजवला होता. मुक्ताईनगर नगरपंचायत प्रभागातील आरक्षण सोडत निघाल्यानंतर काही प्रभागांमध्ये काही खुशी काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली असून पुरुषांच्या ऐवजी महिलांना निवडणूक रिंगणात उभे करण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येते. परंतु गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांना देखील निवडणूक सोपे चित्र नसल्याचे दिसून येते. नगरपंचायती निवडणूक ही लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे निवडणूक लढली जाते. राज्यात महायुती चे सरकार असून महाविकास आघाडी तसेच अन्य राजकीय पक्ष निवडणूक रिंगणांमध्ये किती रस घेतात हे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या माघारीच्या दिवशी स्पष्ट होईल. बहुतांश प्रभागांमध्ये राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत परंतु तिकीट कोणाला द्यावे हे शेवटच्या दिवसापर्यंत सस्पेन्स ठेवले जाते. शेवटी कत्तल ची रात्र यासाठी निर्णायक ठरते.
.




























