इंदापूर तालुक्यातील निमसाखर गाव परिसरात सध्या पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी फेक कांदा विस्कटून नव्याने रोपे टाकण्याचे काम वेगाने सुरू केले असून, सकाळपासून शेतात मोठ्या प्रमाणावर मजूरदेखील कामाला लागले आहेत.
या वर्षी पावसाचा अनियमित पॅटर्न आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे वेळापत्रक थोडे पुढे ढकलले होते. आता जमिनीची ओल आणि हवामानाची स्थिती अनुकूल झाल्यामुळे पाच महिन्याच्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शेतकरी सांगतात की, योग्य वेळी लागवड झाल्यास उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता अधिक असते अशी माहिती निमसाखरचे शेतकरी श्री युवराज सर्जेराव रणमोडे यांनी दिली त्यांनी हेही सांगितले की आमच्या परिसरामध्ये श्री राजाराम बाबुराव दळवी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कांदा बी विस्कटून देतात. कांद्याची उगवण समान होते.
काही शेतकऱ्यांनी ड्रिप सिंचनाचा वापर सुरू केला असून त्यामुळे पाण्याची बचत तसेच कांद्याच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे, बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंता दिसून येत असली तरी उत्पादन चांगले मिळाले तर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निमसाखर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सध्या कांदा रोपांची लावणी पूर्ण क्षमतेने सुरू आहे.
रावेर तालुक्यातील बोहरडे गावातील जी.प. मराठी शाळेतील शिक्षकांची अनुपस्थिती गंभीर; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, शिक्षण विभाग दुर्लक्ष करणार का?
रावेर तालुक्यातील बोहरडे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रचंड अडथळ्यात आले आहे. शाळेत सध्या ३० ते ४० विद्यार्थी असून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. शासनाने या शाळेसाठी दोन शिक्षकांची नियमानुसार नेमणूक केलेली असली तरी प्रत्यक्षात बऱ्याच महिन्यांपासून मुलांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक उपस्थित राहत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरा शिक्षक आपल्या मनाप्रमाणे कधी येतो, कधी अनुपस्थित राहतो आणि अनेक वेळा सलग गैरहजर राहण्याची प्रकरणे घडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण वर्गभार एका शिक्षकावर पडत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. पालकांनी व्यक्त केल्यानुसार, दोन शिक्षक नेमलेले असताना एकाच शिक्षकाकडून चार वर्गांचे अध्यापन व्यवस्थित होणे अशक्य असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार शासन नियमितपणे पगार देत असताना शिक्षक घरी बसून वेतन घेत असल्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांचे म्हणणे आहे की ही परिस्थिती अशीच राहिली तर काही दिवसांनी शाळेला कुलूप लागण्याची वेळ ओढवू शकते.
गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी आणि शाळेत नियमितपणे उपस्थित राहून अध्यापन करण्याची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, अशी गावकऱ्यांची स्पष्ट मागणी आहे. त्यांनी इशारा दिला आहे की शिक्षकाची अनुपस्थिती सुरूच राहिली तर संबंधित शिक्षक, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाविरोधात तहसील कार्यालयासमोर निवेदन देण्यात येणार असून मोठ्या आंदोलनाची तयारीही केली जाईल.
गावकऱ्यांनी विचारलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा—शिक्षण अधिकारी आणि शासन या गंभीर दुर्लक्षाकडे आता तरी लक्ष देणार का? विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे एकमताने सांगितले जात आहे.
जिल्ह्यात अवैध बायोडिझेलवर मोठी धडक
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ हजार किलोहून अधिक जप्त
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात अवैध बायोडिझेलविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आज निर्णायक पाऊल उचलत मोठी कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर–मलकापूर रोडवर संशयितरीत्या उभ्या असलेल्या एका टॅंकरवर छापा घालण्यात आला. या कारवाईत २९०३० किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले असून त्याची बाजारमूल्ये १२ लाख ३३ हजार १९४ रुपये इतकी असल्याचे प्रशासनाने सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार, टॅंकर क्रमांक GJ03BW3034 रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत उभा होता. चौकशीदरम्यान चालक सहदेव याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला आणि पथकाने तत्काळ छापा टाकला. तपासात उघड झाले की हे बेकायदेशीर बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, पणोली, अंकलेश्वर (भरूच, गुजरात) येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघुड (ता. मलकापूर) येथे पाठविले जात होते.
गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी विशेष पथक तयार केले होते. कारवाईनंतर संबंधित टॅंकर ताब्यात घेण्यात आला असून, तहसीलदार राहुल तायडे आणि पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांच्या मार्फत संबंधितांवर एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास जिल्हा प्रशासन आणि पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्याकडे आहे.
डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट संदेश दिला की, “जिल्ह्यात अवैध बायोडिझेलचा कोणताही व्यवहार कदापिही सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तत्काळ प्रशासनाला कळवावी.”
#Buldhana l जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील ‘ऑन फिल्ड’ : वडनेर-मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेलवर छापा
नवीन नेतृत्वाला जिल्ह्यात उत्साहाचे स्वागत
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ बुलढाणा जिल्ह्यात दोन संयुक्त जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
बुलढाणा : जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘voice of media’ संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी यंदा दोन अनुभवी पत्रकारांची संयुक्त निवड करण्यात आली आहे. ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक वैभवराजे मोहिते आणि ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार हे दोघेही मिळून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन पंढरपूर येथे सुरू असून, याच अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी या महत्त्वपूर्ण निवडीची घोषणा केली. नव्या कार्यरचनेनुसार बुलढाणा जिल्ह्याला प्रथमच संयुक्त जिल्हाध्यक्ष मिळत असल्याने संघटनेच्या कामकाजाला नव्या वेगाची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापूर्वी पद भूषवणारे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर नवीन नियुक्तीची प्रतीक्षा सुरू होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय जाहीर केला होता. पंढरपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आणि सर्वानुमते मोहिते व पवार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले.
जिल्ह्यात सकारात्मक वातावरणाची निर्मिती
नव्या नेतृत्वाबाबत पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. मोहिते हे ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक तर पवार हे अनुभवी पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अनुभवामुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळेल आणि संघटनेची कामे अधिक प्रभावीपणे राबवली जातील, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.
संदीप जोगी… मुक्ताईनगर :……. . आज दि. १५ नोव्हेंबर २०२५, शनिवार,पवित्र उत्पत्ती एकादशी निमित्त,संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई समाधीस्थळ मुळमंदिरात भक्तिभावाचा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला. पहाटेपासूनच परिसरात,”जय मुक्ताई”,“ज्ञानोबा माऊली तुकाराम”नामघोषांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
सकाळपासून भाविकांची सतत वाढणारी गर्दी पाहून मंदिर परिसरात भक्तीचा महापूर आल्याचे चित्र दिसत होते. हजारो भाविकांनी संत मुक्ताई आईसाहेबांचे दर्शन घेऊन मन:शांतीचा अनुभव घेतला.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यापूर्वीची मुक्ताईनगर वारी — भक्तिभावाचा अनोखा संगम……
आगामी दि. १७ नोव्हेंबर २०२५, सोमवार रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दिवस साजरा होणार आहे.या पारंपरिक सोहळ्याआधी येणारी आजची एकादशी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील आईसाहेब मुक्ताईंच्या वारीसाठी विशेष दिवस मानला जातो.
आजची एकादशी ही नेमकी संजीवन समाधी सोहळ्याच्या आधी येत असल्याने वारकरी परंपरेत हिला ‘संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वारी’ असेही संबोधले जाते. भाविक या दिवशी आईसाहेब मुक्ताईंचे दर्शन घेऊन, ज्ञानोबांच्या संजीवन समाधीचे स्मरण करत आपली वारी पूर्ण करतात. मुक्ताईनगरातील पवित्र वारी — भक्तीचा विराट आविष्कार
आज पहाटेपासूनच श्री संत मुक्ताई समाधीस्थळ मुळमंदिर परिसरात भाविकांचा ओघ वाढू लागला होता. परिसरात हरिनाम, अभंग, टाळ-मृदंगांची नादमधुर लय, वारकऱ्यांची दिंडी, भक्तीगीतांचा उत्साह,या सर्वांनी वातावरणाला मंगलमय रूप दिले.
परंपरेचा मान राखत श्री विठ्ठल नामाचा गजर, “जय मुक्ताई” “ज्ञानोबा माऊली तुकाराम” नामाचा अखंड जयघोष आणि संत मुक्ताईंच्या चरणी वाहिलेली प्रार्थना,यांनी दिवसभर परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला होता.
संत ज्ञानोबा माऊलींच्या स्मरणाने पूर्ण होणारी वारी
भाविक संत मुक्ताई आईसाहेबांच्या दर्शनाने आपली वारी पुर्ण करतात.श्रीक्षेत्र मुक्ताईनगरमध्ये येऊन आईसाहेब मुक्ताईंच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक मनोमन संत ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करतात व संजीवन समाधी सोहळ्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करतात.
हजारो वारकऱ्यांनी आज मुक्ताई मंदिरात येऊन दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण क्षेत्र गजबजून गेले होते. ह.भ.प. मोहित महाराज पाटील यांचे कीर्तन संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वारीच्या निमित्त विशेष कीर्तन सेवा ह.भ.प. मोहित महाराज पाटील, उटखेडा यांची दुपारच्या वेळेस संपन्न झाली.भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्या सुंदर संगमातून घडलेले हे कीर्तन भाविकांना अंतर्मुख करून गेले. भाविकांसाठी फराळाचे वाटप
श्री सुदेश महाजन,तुरक गोराळा आणि श्री सुरेशसिंह राजपूत,पाथरी यांच्या वतीने एकादशी निमित्त विशेष फराळाचे वाटप करण्यात आले. हजारो वारकऱ्यांना प्रेमपूर्वक फराळ देत सेवा करण्याचा आनंद आयोजकांनी व्यक्त केला. भक्ती, शिस्त आणि भावना — एक सुंदर संगम
एकादशीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून वारीच्या पारंपरिक शिस्तीचे दर्शन घडले.हजारो भाविकांनी “जय मुक्ताई”,‘ज्ञानोबा माऊली तुकाराम” नामघोष करत मुक्ताई आईसाहेबांच्या चरणी वाहिलेली भक्ती—संपूर्ण वातावरणाला पावन करत होती.
मंदिर समिती, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी दिवसभर उत्तम व्यवस्थापन करून भाविकांच्या दर्शन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा यांची प्रभावीपणे काळजी घेतली.
मुक्ताईनगर – नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ हा यंदा SC राखीव प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला असून या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून ॲडवोकेट चेतन भाऊ झनके यांनी आज लक्षवेधी शक्ती प्रदर्शन करत उत्साहात नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
ढोल-ताशांच्या निनादात, कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि विविध समाजबांधवांच्या उपस्थितीत झालेले हे शक्ती प्रदर्शन शहरात चर्चेचा विषय ठरले. मुस्लिम, बौद्ध तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये झनके यांच्या उमेदवारीबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील गेले काही वर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाय करण्याचा निर्धार व्यक्त करत चेतन झनके यांनी जनतेशी संवाद साधला. प्रभागात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या, काही भागांतील अपूर्ण रस्ते, कामगार बांधवांच्या अडचणी, तसेच बौद्ध आणि मुस्लिम वस्त्यांतील प्रलंबित कामांवर तातडीने लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नवीन चेहरा, नवीन दिशा आणि ‘सर्वसामान्यांचा आवाज’ म्हणून नागरिक ॲड. झनके यांच्याकडे पाहत असल्याचे नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
स्थानिक राजकीय वर्तुळातदेखील त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ते ताकदवान प्रतिस्पर्धी ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही राजकीय जाणकारांनी तर भरघोस मतांनी विजयाची शक्यताही नाकारलेली नाही.
प्रभागाच्या विकासगतीला चालना देणारा प्रभावी आणि निरसर व्यक्तिमत्व म्हणून ॲडवोकेट चेतन भाऊ झनके यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मलकापूर (प्रतिनिधी) : कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व मेकॅनिकल विभाग (पॉलीटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व स्वयंसेवकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाली. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगत शिक्षण व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित राष्ट्रनिर्मितीचा पाया त्यांनी घातला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन ज्ञान, संघटन, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांना आचरणात आणले पाहिजे. देशाच्या विकासात प्रत्येक विद्यार्थी सक्रिय योगदान देईल, अशीच अपेक्षा आहे.” प्राचार्य सरांचे हे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
यानंतर प्रा. अमोल तांबे यांनी नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदान, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार, बालप्रेम व आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी केलेल्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहरूंच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी असलेले महत्त्व समजावून सांगत प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमाला प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांच्यासह प्राध्यापकवर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. राजेश सरोदे, प्रा. प्रतीक पाटील, प्रा. सम्राट राजपूत तसेच प्राध्यापिका संगिता खर्चे, ख्याति चौधरी, भाग्यश्री नारखेडे, स्नेहल पवार, मयुरी पाटील, आंचल गोळे आणि अनीता होळे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नेहरूंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. महाविद्यालयात नेहरू जयंती प्रेरणादायी वातावरणात, शिस्तबद्धपणे आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली.
अंतुर्ली फाटा ते बेलसवाडी मार्गावरील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष व नरवेलचे सरपंच मोहन महाजन तसेच स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन झुडपे तात्काळ कापण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
नरवेल फाटा ते भोकरी, धामंनदे, बेलखेड व पातोंडी या रस्त्यांवरही दोन्ही बाजूंना झुडपे व गवत वाढले असून त्यामुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नाहीत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः नरवेल फाट्याजवळ नावापुरते आठ ते दहा फूट झुडपे कापून केवळ देखावा केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे (कॉर्नर) असल्याने झाडे व झुडपांमुळे दृश्य आड येते. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून झुडपे त्वरित कापून रस्ता स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी सरपंच मोहन महाजन व नागरिकांनी केली आहे.
बुलढाणा | अँटी करप्शन ब्युरोची कारवाई – १६,००० रुपयांची लाच स्वीकारताना महिला पुरवठा निरीक्षण अधिकारी रंगेहात
राजिक शेख विशेष प्रतिनिधी.| Viral news live
नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती पुनम श्रीकृष्ण थोरात (वय ३४ वर्षे), वर्ग-२, पुरवठा निरीक्षण अधिकारी, रा. माऊली नगर, पाचपोर यांना अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी १६,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई १४ नोव्हेंबर २०२५ रोजी नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्या दालनात पार पडली.
तक्रारदाराच्या चुलत्यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान असून ते दुकान तक्रारदार स्वतः चालवितात. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पुरवठा अधिकारी नांदुरा यांनी दुकानाची तपासणी केली होती. तपासणी अहवालात कोणतीही त्रुटी नसतानाही हा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तसेच दुकानातील धान्य पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी १६,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा येथे करण्यात आली होती.
त्यानुसार आज आयोजित पडताळणी कार्यवाहीत आणि नंतरच्या सापळा कारवाईत, तक्रारदाराकडून १६,००० रुपये स्वीकारताना श्रीमती पुनम थोरात यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे, तसेच पोलीस उपअधीक्षक श्री भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्री रमेश पवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा — दूरध्वनी: ०७२६२-२४२५४८ व्हॉट्सअॅप: ९४०५०९१०६४ टोल-फ्री क्रमांक: १०६४
इच्छुक उमेदवार पक्षाच्या एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत.
संदीप जोगी मुक्ताईनगर….. दोन वर्ष प्रशासक कालावधी असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी ला सुरुवात झालेली असून जसजशी गुलाबी थंडी वाढत आहे परंतु मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीचे माहोल अजून काही थंडच असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय सह राजकीय पक्षही अजून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी जाहीर करीत नसून कोणत्या उमेदवाराला अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म मिळतो हे 16 नोव्हेंबर च्या कत्तलच्या रात्र नंतरच म्हणजे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी दिसून येईल. माघारीचे दिवसानंतर निवडणुकीच्या प्रचाराला वेद येणार आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत च्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या नजमा इरफान तडवी यांनी पदभार सांभाळला होता. आताही सर्वसाधारण महिला राखीव नगराध्यक्ष पद असल्याने नगराध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे. राज्यात महायुती चे सरकार असून आतापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये महायुतीचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केलेले असल्याचे दिसून येते. शेवटी युती होते की नाही हे अजून फिक्स झालेले नाही. महाविकास आघाडी सुद्धा नगराध्यक्ष ,सदस्य पदासाठी उमेदवार व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे चित्र आहे. सर्व पक्ष आता वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये असल्याचे दिसून येते.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असून यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे, विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचे नेतृत्व पणाला लागणार असल्याचे चित्र आहे . 18 ऑगस्ट 2023 पासून मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये प्रशासक असून दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये 37 कोटी 52 लाखाची विकास कामे प्रशासक कालावधीमध्ये झालेली आहेत. विधानसभेचे आमदार यांच्या सहकार्याने विकास कामे पूर्णत्वास येत आहेत. मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास 60 ते 70 टक्के अतिक्रमण असून हा मुद्दाही निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना पुढे डोकेदुखी होऊ शकतो. स्वतःकडे अथवा कुटुंबातील सदस्यांकडे नगरपंचायत हद्दीमध्ये अतिक्रमण असल्यास सदस्याच्या सदस्य पदावर गदा येऊ शकते.
दिल्ली हाईकोर्ट ने उत्तर प्रदेश और उत्तराखंड में मिलाद-उन-नबी के दौरान “I Love Muhammad” पोस्टर लगाने को लेकर दर्ज कई एफआईआर की निष्पक्ष जांच की मांग करने वाली जनहित याचिका (PIL) को खारिज कर दिया। याचिका में आरोप लगाया गया था कि दोनों राज्यों की पुलिस ने सांप्रदायिक पक्षपात दिखाते हुए शांतिपूर्ण धार्मिक अभिव्यक्ति को अपराध के रूप में प्रस्तुत किया।
मुख्य न्यायाधीश डी.के. उपाध्याय और न्यायमूर्ति तुषार राव गेडेला की खंडपीठ ने शुजात अली द्वारा दायर याचिका को यह कहते हुए निरस्त किया कि याचिकाकर्ता के पास पर्याप्त सार्वजनिक हित का आधार नहीं है। अदालत ने यह भी स्पष्ट किया कि अन्य राज्यों में दर्ज एफआईआर से जुड़े मामलों में दिल्ली हाईकोर्ट कोई दिशा-निर्देश जारी नहीं कर सकता।
याचिकाकर्ता का कहना था कि आरोपी लोगों ने बारावफात के जुलूस के दौरान केवल पैगंबर मोहम्मद के प्रति अपनी आस्था व्यक्त की थी और कोई गैरकानूनी कार्य नहीं किया। हालांकि, अदालत ने कहा कि संबंधित व्यक्ति उचित कानूनी माध्यमों से अपनी बात रख सकते हैं।
एसोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स (APCR) की एक रिपोर्ट के अनुसार, शुरुआती चरण में कम से कम 21 एफआईआर दर्ज की गई थीं, जिनमें 1,300 से अधिक मुस्लिम नागरिकों को आरोपी बनाया गया। अक्टूबर की शुरुआत तक यह संख्या बढ़कर 4,500 से अधिक पहुंच गई, जबकि 265 लोगों को गिरफ्तार भी किया गया। रिपोर्ट में रात्रिकालीन छापों, मनमानी हिरासत और पोस्टर लगाने वाले घरों पर कार्रवाई जैसे आरोप भी शामिल हैं।
वकीलों और सामाजिक कार्यकर्ताओं ने इस मामले को पक्षपातपूर्ण कार्रवाई का उदाहरण बताते हुए कहा कि पैगंबर मोहम्मद के प्रति प्रेम व्यक्त करना आस्था का हिस्सा है, न कि किसी प्रकार का उकसावा।
यह विवाद 4 सितंबर 2025 को कानपुर में शुरू हुआ, जब सैयद नगर की ज़फर वाली गली में निकाले गए बारावफात जुलूस के दौरान प्रतिभागियों ने “I Love Muhammad” लिखा बैनर लगाया था। आरोप है कि कुछ हिंदुत्ववादी समूहों के सदस्यों ने नारेबाजी करते हुए बैनर को फाड़ दिया। इसके बावजूद पुलिस ने 25 मुस्लिम नागरिकों पर सांप्रदायिक वैमनस्य फैलाने और शांति भंग करने के आरोपों में प्रकरण दर्ज किया, जबकि बैनर फाड़ने वालों पर तत्काल कोई कार्रवाई नहीं हुई।
सिंदखेड राजा तालुक्यातील चोरपांग्रा येथील रंजना संदीप चव्हाण (वय ५२) यांचा काही दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना वीज पडून दुर्दैवी निधन झाला होता. रंजना संदीप चव्हाण यांचे बिबी येथील भारतीय स्टेट बँकेत खाते असून त्यांनी फक्त १००० रुपयांचा अपघाती विमा घेतलेला होता. या विम्याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला तब्बल २०,००००० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.या धनादेशाचे सुपूर्दगिरी कार्यक्रम स्टेट बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या वेळी शाखा प्रबंधक दिलीप पवार , कॅशियर पंकज डांगे , फिल्ड ऑफिसर सागर उटाणे , शशांक कडेवे , ज्ञानेश्वर लिंगायत , मनोज बोरे , देविदास गाढवे , प्रवीण मोरे , अंकित साळवे , इत्यादींची उपस्थिती होती तसेच शाखा प्रबंधक दिलीप पवार यांच्या हस्ते मृतकाचा मुलगा संदीप चव्हाण यांना धनादेश देण्यात आला.
अपघाती विमा काढण्याचे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या वतीने १८ ते ६० वर्षे वयोगटातील बचत खातेदारांसाठी अत्यल्प प्रीमियममध्ये अपघाती विमा योजना राबवण्यात आली आहे. फक्त १ हजार रुपयात २० लाखांपर्यंत, तर २ हजार रुपयात ४० लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकते. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचा लाभ सर्व खातेदारांनी घ्यावा, असे आवाहन शाखा प्रबंधक दिलीप पवार यांनी केले.
रत्नागिरी किनारपट्टीसह सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांची तपासणी मोहीम तीव्र
मुंबई, 13 नोव्हेंबर — दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडक उपाययोजना राबविल्या आहेत. किनारपट्टी परिसर, बंदरं, जेटी, संवेदनशील ठिकाणं, बाजारपेठा, रेल्वे स्थानकं, बसस्थानकं आणि धार्मिक स्थळांवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
या मोहीमेअंतर्गत संशयास्पद वस्तू, वाहनं आणि व्यक्तींची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल, वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा 1093 या किनारी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिस प्रशासनाने केलं आहे.
जिल्हा पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सतत गस्त वाढविण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहून पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अल-फलाह यूनिवर्सिटी के आर्थिक व संस्थागत संबंधों की जांच शुरू
लाल किला ब्लास्ट प्रकरण में तीन डॉक्टर हिरासत में, ईडी ने की जांच शुरू
फरीदाबाद (हरियाणा) — हाल ही में लाल किले के पास हुए धमाके में 13 लोगों की मौत के बाद अब प्रवर्तन निदेशालय (ED) ने फरीदाबाद स्थित अल-फलाह यूनिवर्सिटी के आर्थिक व संस्थागत संबंधों की जांच शुरू कर दी है। यह जांच उन व्यक्तियों से जुड़े संभावित वित्तीय संबंधों को लेकर की जा रही है, जिन्हें इस धमाके के मामले में गिरफ्तार किया गया है।
अधिकारियों के अनुसार, अल-फलाह यूनिवर्सिटी से जुड़े तीन डॉक्टरों को हिरासत में लिया गया है, जिनमें सहायक प्राध्यापक डॉ. उमर नबी भी शामिल हैं। बताया जा रहा है कि वही डॉक्टर उस हरियाणा रजिस्ट्रेशन वाली कार को चला रहे थे जिसमें विस्फोट हुआ था।
अल-फलाह यूनिवर्सिटी एक निजी संस्था है, जो हरियाणा प्राइवेट यूनिवर्सिटीज एक्ट के तहत स्थापित की गई है। विश्वविद्यालय के परिसर में मेडिकल कॉलेज और अस्पताल भी संचालित होते हैं। विश्वविद्यालय प्रशासन ने एक बयान जारी कर कहा है कि वह राष्ट्रीय सुरक्षा से जुड़े इस मामले में जांच एजेंसियों के साथ पूर्ण सहयोग कर रहा है ताकि निष्पक्ष जांच हो सके।
सूत्रों के मुताबिक, हिरासत में लिए गए तीनों डॉक्टर विश्वविद्यालय के मेडिकल विभाग से जुड़े हैं और पहले भी उनसे उनके पेशेवर एवं वित्तीय संबंधों को लेकर पूछताछ की जा चुकी है।
अधिकारियों का कहना है कि प्रारंभिक जांच में संस्थानिक नेटवर्क के दुरुपयोग के संकेत मिले हैं, जिसके चलते ईडी ने फंडिंग पैटर्न और संभावित बाहरी संबंधों की जांच शुरू की है।
हालांकि, विश्वविद्यालय प्रशासन ने इन आरोपों को संपूर्णतः निराधार और भ्रामक बताया है। अपने आधिकारिक बयान में विश्वविद्यालय ने कहा कि “संस्थान का कोई भी संसाधन अनुचित तरीके से इस्तेमाल नहीं किया गया है। हम कानून पर पूर्ण विश्वास रखते हैं और सच्चाई सामने आने तक जांच एजेंसियों को पूरा सहयोग दे रहे हैं।”
विश्वविद्यालय ने यह भी कहा कि वह एक शैक्षणिक और स्वास्थ्य सेवा केंद्र के रूप में अपनी प्रतिष्ठा की रक्षा के लिए प्रतिबद्ध है और बिना प्रमाण के लगने वाले आरोप उसके नाम को नुकसान पहुँचा रहे हैं।
सोमवार को हुए इस उच्च तीव्रता वाले धमाके ने लाल किले के पास खड़ी एक कार को चपेट में ले लिया था। पुलिस ने कुछ ही घंटे पहले एक “व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल” के भंडाफोड़ की घोषणा की थी। इस घटना में 13 लोगों की मौत और कई घायल हुए। अब तक आठ लोगों को हिरासत में लिया गया है, जिनमें अल-फलाह यूनिवर्सिटी से जुड़े तीन डॉक्टर भी शामिल हैं।
अधिकारियों ने बताया कि ईडी की यह जांच राष्ट्रीय जांच एजेंसी (NIA) की जांच के समानांतर चलेगी, जिसमें धन के प्रवाह और पूरे ऑपरेशनल नेटवर्क की तह तक जाने की कोशिश की जाएगी।
फिलहाल किसी भी संस्थागत स्तर पर प्रत्यक्ष संलिप्तता की पुष्टि नहीं हुई है। जांच एजेंसियों का कहना है कि जांच से यह स्पष्ट होगा कि क्या विश्वविद्यालय के संसाधनों या नेटवर्क का उपयोग अवैध गतिविधियों के लिए किया गया था।
इस बीच, सिविल राइट्स संगठनों और सामाजिक कार्यकर्ताओं ने चिंता व्यक्त की है कि बिना ठोस सबूत के मुस्लिम शैक्षणिक संस्थानों और पेशेवरों को निशाना बनाए जाने की प्रवृत्ति बढ़ रही है।
एसोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिविल राइट्स (APCR) और यूनाइटेड अगेंस्ट हेट से जुड़े सदस्यों ने कहा कि जांच पारदर्शी और साक्ष्य-आधारित होनी चाहिए तथा बिना प्रमाण के बनाई जाने वाली सार्वजनिक कथाओं से समुदाय विशेष को कलंकित नहीं किया जाना चाहिए।
कुछ कार्यकर्ताओं ने यह भी कहा कि पहले भी कई मामलों में बिना तथ्यों की पुष्टि किए मीडिया रिपोर्टिंग से इस्लामोफोबिक माहौल पैदा हुआ था, जिससे समाज में गलत संदेश गया।
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघात उद्भवलेल्या शेतकरी अनुदान घोटाळ्याविरोधात सुरू असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष आज दि. १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या लाक्षणीक लक्षवेधी आंदोलनाकडे लागले आहे. मा. आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार तथा भाजपा नेते मा. दिलीपभाऊ वाघ, भाजपा नेते मा. अमोलभाऊ शिंदे, भाजपा नेत्या मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी, काँग्रेस नेते मा. सचिनदादा सोमवंशी तसेच उबाठा नेते मा. उध्दव मराठे व मा. रमेशशेठ बाफना या विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी तसेच पत्रकार बांधवांनी आतापर्यंत या प्रकरणी वेळोवेळी तीव्र निषेध नोंदविला आहे. मात्र आजच्या आंदोलनात हे मान्यवर नेमकी कोणती ठोस भूमिका घेतात, कोणती कृती जाहीर करतात आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे. आंदोलक संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे की आता केवळ घोषणा व आश्वासनांनी शेतकऱ्यांचे दु:ख दूर होणार नाही, तर थेट पुर्ती आणि कारवाईची मागणी आहे. त्यासाठी दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणाही महाजन यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी ठेवलेल्या त्यांच्या ११ मागण्यांमध्ये 2025 ची अतिवृष्टी अनुदान जामनेर- चाळीसगाव प्रमाणे निकष लावून सरसकट खात्यात जमा करणे, २०१९ पासून आतापर्यंतच्या अनुदानाची सर्व माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध करणे, जालना, पाचोरा, मुक्ताईनगर येथे शेतकऱ्या अनुदान घोटाळे उघड झाले आहे त्यामुळे या प्रकरणाचे राज्यभर SIT/ED/CBI च्या तपासाची मागणी, पाचोरा येथील प्रथम तक्रारदाराच्या कबुलीनुसार तातडीने अटक, संशयित समितीऐवजी आर्थिक गुन्हा शाखेकडून स्वतंत्र तपास, न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी आरोपींना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक, सर्व पंचनामे व जबाब व्हिडिओ रेकॉर्डवर घेणे, लोकप्रतीनीच्या बनावट सह्या करणाऱ्यांची संपूर्ण नावे जाहीर करणे, ग्राम महसूल अधिकारी आशिष कडूबा काकडे व आरोपी गणेश हेमंत चव्हाण त्यांच्या नातेवाईकांना तातडीने अटक करणे व बोगस जमिनी व अवाजवी मालमत्ता खरेदीची चौकशी करून त्यांच्या मालमत्ता सरकार जमा करणे या मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांच्या केंद्रस्थानी शेतकऱ्याच्या घामाचा आदर आणि भ्रष्टाचाराचा निर्णायक अंत हीच भूमिका आहे. त्यामुळे आज आंदोलनाच्या स्थळी येणारे राजकीय व शासकीय मान्यवर आपल्या भूमिकेचे स्पष्ट विधान प्रसार माध्यमांसमोर करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी, पत्रकार बांधव आणि हितचिंतकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत आंदोलक संदीप महाजन यांनी सर्वांना आवाहन केले आहे –
“आता आश्वासन नको, तर पुर्ती हवी! शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे.”
बुलढाणा (प्रतिनिधी) — वॉइस ऑफ मीडिया बुलढाणा उर्दू विंगतर्फे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवडणुकीदरम्यान RNI (Registrar of Newspapers for India) व PRGI (Press Registrar General of India) मान्यताप्राप्त पत्रकारांना प्रवेश नाकारण्याच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य शासनाने नुकताच काढलेल्या आदेशानुसार मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांवर केवळ राज्य शासनाच्या यादीतील वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नोंदणीकृत (RNI) तसेच PRGI कडून मान्यता प्राप्त असलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारला जात आहे. वॉइस ऑफ मीडिया संस्थेचे जिल्हा अध्यक्ष (उर्दू विंग) जफर खान अतहर खान यांनी निवेदनात नमूद केले की — “RNI व PRGI या दोन्ही संस्था भारत सरकारमान्य असून त्यांच्याकडून नोंदणीकृत वृत्तपत्रे व पत्रकारांना प्रवेश न देणे हे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. आज अनेक स्वतंत्र व ऑनलाईन माध्यमे समाजापर्यंत सत्य माहिती पोहोचविण्याचे कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यांना शासनाच्या यादीत नसल्यामुळे वगळणे हे लोकशाहीच्या पारदर्शकतेस बाधक ठरेल.” निवेदनात मागणी करण्यात आली की RNI व PRGI मान्यताप्राप्त पत्रकारांना निवडणुकीदरम्यान प्रवेशिका देण्यात याव्यात, शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून सर्व पत्रकारांना समान संधी द्यावी, तसेच ऑनलाईन व स्वतंत्र माध्यमांनाही पारदर्शकतेच्या दृष्टीने प्रवेश द्यावा. या प्रसंगी मोहम्मद सरवर मोहम्मद अल्ताफ, इलिया शाह अशफाक शाह, शेख इरफान शेख ईसा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर (अतिक खान) मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गटारीतून काढलेला दुर्गंधीयुक्त कचरा अद्यापही वार्ड क्रमांक ११ मध्ये नागरिकांच्या घरासमोर तसाच पडून आहे.
या घाण कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, रोगराईचा धोका वाढला आहे. टायफॉईड, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
“कचरा साफ केल्यानंतर लगेच उचलणे गरजेचे असताना नगरपंचायतीकडून कोणतीही कारवाई झाली नाही,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दोन दिवस उलटूनही नगरपंचायतीची गाडी कचरा उचलण्यासाठी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक प्रशासनाने तातडीने या परिस्थितीकडे लक्ष देऊन कचरा उचलण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी संकेत संजय सावळे याने अँटी रॅगिंग नॅशनल कॉन्टेस्ट २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह मलकापूर शहराचा अभिमान वाढविण्यात संकेतनं मोठा वाटा उचलला आहे. ही स्पर्धा विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय अँटी रॅगिंग देखरेख संस्था (सेंटर फॉर यूथ) यांच्या वतीने देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करणे, शैक्षणिक परिसरात सुसंवाद, शिस्त, आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे.
देशभरातील विविध राज्यांतील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. संकेतनं “युट्यूब व्हिडिओ श्रेणी” अंतर्गत सादर केलेल्या सामाजिक संदेशपर व्हिडिओद्वारे रॅगिंगविरोधी जनजागृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्याच्या या कलात्मक आणि जनजागृतीपर प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, त्याला गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात एक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते संकेतनं सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. योगेश सुशीर, तसेच प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. निलेश बुडूखले, प्रा. निलेश बुंधे आणि प्रा. अमोल हळदे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. युगेश खर्चे, तसेच अँटी रॅगिंग समितीच्या समन्वयक प्रा. तेजल खर्चे यांनीही मार्गदर्शन करून संकेतनं दिलेल्या सामाजिक संदेशाचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक शिक्षणातच नव्हे, तर सामाजिक भान जपत समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. संकेतनं सादर केलेला व्हिडिओ रॅगिंगविरोधी जागरूकतेचा प्रभावी संदेश देणारा असून तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना नेहमीच सामाजिक बांधिलकी असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. संकेतनं मिळवलेल्या या राष्ट्रीय गौरवामुळे पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर तसेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले आहे. संकेतच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे असे प्रतिपादन व्यवस्थापन समितीचे खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री.पराग पाटील डॉ. गौरव कोलते देवेंद्र पाटील यांनी केले आहे.
पिंपळगाव राजा : वॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या वतीने आयोजित पदवितरण सोहळा पिंपळगाव राजा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बुलडाणा जिल्हा अध्यक्ष जफर खान अतहर खान आणि बुलडाणा जिल्हा सचिव शेख सरदार शेख कादिर यांच्या हस्ते विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिस्तबद्ध आणि औपचारिक पद्धतीने करण्यात आले. मोहम्मद तौसीफ मोहम्मद शफीक यांची बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच शेख रफीक शेख करीम यांची जळगाव जामोद तालुका अध्यक्ष तर शेख राजिक शेख रहीम यांची नांदुरा तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटनेच्या मूल्याधारित पत्रकारितेला बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला. वॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या माध्यमातून जिल्ह्यात रचनात्मक आणि जबाबदार पत्रकारितेचा संदेश पोहोचवण्याचे उद्दिष्ट यावेळी मांडण्यात आले.
(अतिक खान)मुक्ताईनगर जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे गंभीर चित्र आता समोर येत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत शांत, सुस्थितीतील मानला जाणारा हा जिल्हा आज गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे चोरी, दरोडे, मारहाण, खून, गोळीबार अशा घटनांचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्या आता “नुसता पोरखेड सारखा प्रकार” बनल्या आहेत. एका घटनेची धास्ती संपत नाही तोच दुसरा गोळीबार होतो, असे जणू चक्र तयार झाले आहे. पोलिस प्रशासनावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील संवेदनशील भागात गस्त वाढवणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि गुप्त माहिती यंत्रणा मजबूत करणे यावर भर देणे गरजेचे आहे.
राजकीय हस्तक्षेप, बेरोजगारी, आर्थिक विषमता आणि नशेचे वाढते प्रमाण हीसुद्धा गुन्हेगारी वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे समाजतज्ज्ञांचे मत आहे. योग्य वेळी ठोस पावले न उचलल्यास जळगाव जिल्हा कायमचा असुरक्षिततेच्या छायेत जाईल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक एकच मागणी करत आहेत — “आम्हाला सुरक्षित जीवन हवे आहे!”