Friday, November 21, 2025
Home Blog

संत मुक्ताई नगरीत श्री स्वामी समर्थ पादुका सोहळ्याचा भक्तिमय जल्लोष


असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संत मुक्ताई मंदिरात तुळशी विवाह व पादुका मिरवणुकीचा भव्य सोहळा पार पडला!

मुक्ताईनगर (अतिक खान)
संत मुक्ताईच्या पावन भूमीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम घडविणारा श्री स्वामी समर्थ पादुका आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या वतीने प्रस्थान ठेवलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुका दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुक्ताईनगर येथे आगमन झाल्या.
या आगमनाचे औचित्य साधून कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त नवीन संत मुक्ताई मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.
या वेळी असंख्य सेवेकरी भगिनी, भक्त, महिला मंडळे आणि सेवेकरी बांधवांनी हजेरी लावून अध्यात्माच्या सागरात न्हाऊन निघाले.

भव्य मिरवणुकीने उजळली मुक्ताईनगरी!
६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी नवीन मुक्ताई मंदिरापासून श्री स्वामी समर्थ केंद्र, जुने गाव मुक्ताईनगरपर्यंत स्वामींच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघाली.
संपूर्ण पालखी मार्ग फुलांच्या आणि रांगोळ्यांच्या सजावटीने सुशोभित झाला होता. श्रद्धाळूंनी ठिकठिकाणी पादुकांचे पूजन, आरती, फुलवर्षाव आणि भक्तिगीतांद्वारे स्वागत केले.

“जय जय स्वामी समर्थ!” च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले.
सेवेकरी बांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
भाविकांना नितीनकुमार जैन यांनी पिण्याच्या पाण्याचे वाटप करून प्रशंसनीय सेवा बजावली.

आध्यात्मिक एकतेचा संदेश देणारा हा पादुका सोहळा भक्तांच्या अंत:करणात नवी श्रद्धा, भक्ती आणि समाधान निर्माण करून गेला.
मुक्ताईनगर शहर भक्तीमय रंगात न्हाऊन निघाले आणि संत परंपरेचा वारसा या सोहळ्याद्वारे पुन्हा उजळून निघाला.

मलकापूर नगरपरिषद निवडणूक 2025 : नामनिर्देशन मागे घेणाऱ्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर

मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्ण झाली असून, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मलकापूर नगरपरिषद यांच्या कार्यालयाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. नमुना 6 नुसार नगरसेवक पदाकरिता एकूण 60 आणि नगराध्यक्ष पदाकरिता 2 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन मागे घेतले आहे. राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भातील संपूर्ण यादी सादर करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय उमेदवारांनी मागे घेतलेल्या नामनिर्देशनाची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.

नगराध्यक्ष पद – प्रभाग क्रमांक 999 (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग)

नगराध्यक्ष पदाकरिता दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून त्यामध्ये बानो बी शेख इस्माईल, अहमदशाहपुरा पारपेठ, मलकापूर आणि राठी चेतना गिरीराज, गोकुळ नगर, मलकापूर यांचा समावेश आहे.

प्रभाग 1-अ (आरक्षण : अनुसूचित जाती – महिला)

वानखेडे शीला संजय, स्कुल ऑफ स्कॉलरजवळ, मलकापूर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

प्रभाग 1-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

जाधव गंगाधर मुरलीधर, शिवाजी नगर, मलकापूर मोरे लता राजाराम, शिवाजी नगर, मलकापूर

प्रभाग 2-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग)

काळे अजय शांताराम, लक्ष्मी नगर, नांदुरा रोड, मलकापूर वानखेडे रवि मोहन, पुरोहीत कॉलनी, बिर्ला रोड, मलकापूर

प्रभाग 2-ब (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

या प्रभागातून कोणतीही वैध उमेदवारी मागे घेण्यात आलेली नाही.

प्रभाग 3-अ (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

खर्चे स्वाती संजय, हनुमान नगर रोड, तुळजाई अपार्टमेंट, मलकापूर झोपे मंगला अनिल, टेलिफोन कॉलनी, गोकुळ नगर, मलकापूर

प्रभाग 3-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

या प्रभागातून कोणतीही उमेदवारी मागे घेण्यात आलेली नाही.

प्रभाग 4-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग)

चांद अब्दुल जब्बार, आंबेडकर नगर, मलकापूर

प्रभाग 4-ब (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

वानखेडे दुर्गा राजकुमार, सुभाषचंद्र बोस नगर, मलकापूर

प्रभाग 5-अ (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

कुरैशी शकीला बी शेख शकील, कुरेश नगर, पारपेठ, मलकापूर हमीदा बी शे मलंग, कुरेश नगर, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 5-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

मिर्झा जिशान बेग मिर्झा कलीम बेग, पिलू तकीया वार्ड, धनगर पुरा, पारपेठ, मलकापूर मोहम्मद रेहान शेख बुडन, पांढरी प्लॉट, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 6-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग – महिला)

शबाना बी मो. अकरम, कुरेश नगर, पारपेठ, मलकापूर यास्मिन बी शेख सलीम, पांढरी प्लॉट, पारपेठ, मलकापूर बानो बी शेख इस्माईल, अहमदशाहपुरा, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 6-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

इस्माईल खान कासम खान, पांढरी प्लॉट, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 7-अ (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

गुलनाज परविन मोहम्मद शोएब, ताज नगर, पारपेठ, मलकापूर शमशाद बी सलीम खान, मंगलगेट, मालवीपुरा, मलकापूर शाईस्ता परवीन शेख शब्बीर, ताज नगर, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 7-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

खान शहेजाद सलीम खान, मंगल गेट, मालवीपुरा, मलकापूर

प्रभाग 8-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग – महिला)

आमेना बी बिस्मिल्लाह शाह, मदार टेकडी, काझी प्लॉट, पारपेठ, मलकापूर गुलनाज परविन मोहम्मद शोएब, ताज नगर, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 8-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

खान इमरान लाल, फकीरपुरा, मशीद मागे, पारपेठ, मलकापूर जाकेरा परवीन वसिम खान, ताज नगर, पारपेठ, मलकापूर शबनुर बी नसिर खान, मदार टेकडी, पारपेठ, मलकापूर शेख करीम शेख गफ्फार, मदार टेकडी, पारपेठ, मलकापूर सै ताहेर शब्बीर, मदार टेकडी, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 9-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग)

अय्युब शाह अब्दुल्ला शाह, मदार टेकडी, पारपेठ, मलकापूर शाह एजाज अहमद अयाज, धनगर पुरा, पारपेठ, मलकापूर सय्यद अजीम सय्यद नूरा, अहमदशाहपुरा, पारपेठ, मलकापूर

प्रभाग 9-ब (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

या प्रभागातून कोणतेही नामनिर्देशन मागे घेण्यात आलेले नाही.

प्रभाग 10-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग)

अकोटकर विनोद मुरलीधर, कुलमखेड, मलकापूर भोंबे अंकुश सुभाष, कुलमखेड, मलकापूर रफिक अहमद शेख याकुब, छोटा बाजार, मलकापूर शेख राझिक शेख शब्बीर, छोटा बाजार, मलकापूर शेख हुसेन शेख अमीर, मोहनपुरा, मलकापूर

प्रभाग 10-ब (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

या प्रभागातून कोणतीही उमेदवारी मागे घेतलेली नाही.

प्रभाग 11-अ (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

खान सुलतानाबानो वाजीद, बारादारी मस्जिदजवळ, मलकापूर जहीराबी शेख मजीद, दुर्गा नगर, बारादारी, मलकापूर

प्रभाग 11-ब (आरक्षण : सर्वसाधारण)

अ. मजीद शेख रहेमान, बारादारी, मलकापूर उखर्डे राजेश सखाराम, गाडेगाव मोहल्ला, मलकापूर खान वाजीद मेहबुब, वार्ड क्र. 11, बारादारी मस्जिदजवळ, मलकापूर घीर्णीकर विशाल रामचंद्र, श्रीराम मंदिर वार्ड, नसवाल चौक, मलकापूर राजपूत गोपालसिंह रणजितसिंह, बारादारी, मलकापूर साजिद अहमद खान मोहम्मद खान, बारादारी, मलकापूर

प्रभाग 12-अ (आरक्षण : सर्वसाधारण – महिला)

ठाकुर मायादेवी अजयसिंह, गाडेगाव मोहल्ला, मंगलगेट, मलकापूर

प्रभाग 13-व (आरक्षण : सर्वसाधारण) एजाजकिबरीया मकसुदअलीखा, मालीपुरा, मलकापूर आणि साजीद खान अनिस खान, मालीपुरा, मलकापूर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

प्रभाग 14-अ (आरक्षण : अनुसूचित जाती) वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. (नावे नमूद नाहीत.)

प्रभाग 14-ब (आरक्षण : सर्वसाधारण – महिला) धोरण कल्याणी प्रशांत, मातामहाकाली नगर, बसस्टॅण्ड जवळ, मलकापूर लालवाणी गायत्री गिरीश, सिंधी कॉलनी, मलकापूर लुल्ला जिविका विक्की, सिंधी कॉलनी, मलकापूर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

प्रभाग 15-अ (आरक्षण : नागरीकांचा मागास प्रवर्ग – महिला) पाटील वनिताबाई अरविंद, गुरुनानक वार्ड, गजराज बुक डेपो मागे, बुलढाणा रोड, मलकापूर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

प्रभाग 15-ब (आरक्षण : सर्वसाधारण) पाटील अरविंद जानकीराम, गुरुनानक वार्ड, गजराज बुक डेपो मागे, मलकापूर रामा प्रकाश मेहसरे, माता महाकाली नगर, मलकापूर रावळ आदित्य हरीश, शास्त्री नगर, मलकापूर वृषभ शंकर क्षिरसागर, संत ज्ञानेश्वर नगर, मलकापूर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना तत्काळ रक्कम रु.२३,०००/- द्या – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मलकापूर तालुकाप्रमुख.

मलकापूर: आशा वर्कर अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा दिल्याबद्दल शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहनपर भत्ता तत्काळ अदा करण्याबाबत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. पी. पवार साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महाआयुष सर्वे करणे, कोविड-१९ संबंधित ईतर कामे” अहोरात्र मेहनत घेऊन जिवाची पर्वा न करता केल्याबाबत उजळणी करून दिली. त्या अनुषंगाने आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना मानधना व्यतिरिक्त कोरोना काळातील २३ महिन्यांसाठी दरमहा १०००/- रु. रक्कम प्रोत्साहनपर भत्ता “शासन परीपत्रक गा.वि.वि.क्र. चोविआ – २०२०/प्र/क्र.४२/वित्त-४ दि. ३१ मार्च २०२०” प्रमाणे देण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेले होते.
तरी आजवर मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांना ग्रामपंचायत मार्फत प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाही. ग्रामपंचायत अधिकारी त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. कोणी तर चक्क लाच मागत आहे. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी दिपक पाटिल यांच्या कडे प्राप्त झाल्या बाबत देखील त्यांनी नमूद केले.
कोरोना काळात दिलेल्या सेवेचा मोबदला रक्कम रु.२३,०००/- प्रत्येकाला तत्काळ एका आठवड्यात वितरित करावा, अन्यथा शिवसेना मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नंतरच्या परिणामास शासन जबाबदार राहील, असा ईशारा शिवसेने व्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा यांना निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

मुक्ताईनगर येथील प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संगठन तर्फे मौजे डोंगराळे ता. मालेगांव जि.नाशिक येथे घडलेली घटना जाहीर निषेध..

संदीप जोगी… मुक्ताईनगर……,

मुक्ताईनगर येथील प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संगठन तर्फे मौजे डोंगराळे ता. मालेगांव जि.नाशिक येथे घडलेली घटना जाहीर निषेध करण्यात आले व निवेदन देण्यात आले त्यात सविस्तर वृत असे की,मौजे डोंगराळे ता. मालेगांव जि.नाशिक येथे कु.यज्ञा जगदीश दुसाने या ४ वर्षाच्या चिमुकली वरती एक नराधमाने शारीरिक अत्याचार करुन तिची निघृनपणे हत्या करुन मानवतेला काळीमा फासला आहे.अशा क्रूर कर्म करणा-या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी सदरच्या खटल्यात पोस्को बाल अत्याचार कलमा लावुन फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. या गंभीर घटनेची आम्ही मानव अधिकार एंव महिला अपराध नियंत्रण संघटना तालुका शाखा मुक्ताईनगर तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच बालीकेच्या पीडीत कुंटुबास शासानाकडुन तातडीने आर्थिक मदत व योग्य भरपाई मंजुर करण्यात यावी सदर घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात असुन विवीध संघटना ह्या रस्त्यावर उतरल्या असुन मोर्चा आंदोलन करीत आहे. व तिव्र संतापाची लाट पसरलेली असुन कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वास ढळत चालला आहे. सदरचे मागणीसाठी संघटनेचे वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर प्रशासन यांना संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांचे आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष मोहन मेढे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवेदन सादर केले या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, तालुका सचिव हकीम चौधरी,तालुका अध्यक्ष भास्कर जंजाळकर, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर, तालुका कार्याधेक्ष बी. डी. गवई,शहर संघटक राजेंद्र वानखेडे, सदस्य रवींद्र शिरसोदे, शिवाजी कठोरे, सुपडू बोदडे, राजकुमार जैन, सौ. भारती लोखंडे, रामदास सुतार, इंद्रायणी भोई, आदी उपस्थित होते.

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे शिवारात 35 लाखांचा गांजा जप्त मोठी कारवाई

मुक्ताईनगर : तालुक्यात अवैध गांजा शेतीविरोधात पोलि सांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. निमखेडी शिवारात पोलिसांनी केलेल्या धाडीत तब्बल ३५ लाखांचा अवैध गांजा जप्त करण्यात आला. गेल्या दोन दिवसांतील ही तालुक्यातील दुसरी मोठी कारवाई आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, उपनिरीक्षक नयन पाटील यांनी संयुक्तरित्या ही धाड टाकली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढाकरे यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कालच मानेगाव येथे २३ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आज निमखेडी येथील कारवाईत आणखी ३५ लाखांचा मुद्देमाल हातात लागल्याने पोलिसांनी अवैध शेती करणाऱ्यांवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या दोनही प्रकरणांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये या घटनांची मोठी चर्चा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी बेलदार आडनावाच्या व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती पुढे येत असली, तरी ते एकमेकांचे नातेवाईक आहेत का, याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गाव परिसरात अशाच प्रकारची अवैध शेती होत असल्याची माहिती मिळताच ती तात्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून या गैरप्रकारावर प्रभावीपणे अंकुश ठेवता येईल.अशी माहिती मिळत आहे

मुक्ताईनगर येथे नगरपंचायत निवडणूक कामाचा घेतला निवडणूक निरीक्षक यांनी आढावा.

_ शहरात पाच बूथ क्रमांक संवेदनशील केंद्र. _ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार मतमोजणी.

संदीप जोगी मुक्ताईनगर…..

गेल्या दोन वर्षापासून प्रशासक असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक कामाचा आढावा तसेच मतदान केंद्र , मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंग रूम ची पाहणी मुक्ताईनगर निवडणूक निरीक्षक बाळासाहेब पारधे यांनी केली. त्यांचे सोबत मुक्ताईनगर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वखारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे , पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, निवासी नायब तहसीलदार निकेतन वाडे यांचे सह निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मतदान दोन डिसेंबर डिसेंबर रोजी असून मतमोजणी तीन डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुक्ताईनगर येथे होणार असून येथेच बॅलेट युनिट साठी स्ट्रॉंग रूम करण्यात आलेली आहे.
मुक्ताईनगर शहरात एकूण 28 मतदान केंद्र असून यामध्ये शहरातील जिल्हा परिषद उर्दू मुला-मुलींची शाळा क्रमांक दोन मध्ये तीन मतदान केंद्र संवेदनशील असून यामध्ये प्रभाग क्रमांक 9, 10 , 11 मधील बूथ क्रमांक 9/1, 9/2, 10/1,11/1,11/2 ही संवेदनशील बूथ क्रमांक आहेत अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश वखारे यांनी दिली.
__ उद्या 21 नोव्हेंबर रोजी नाम निर्देशन पत्र दाखल माघारीच्या दिवशी निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच तर्क वितर्क लढवले जाऊ शकतात.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या ( महिला विभाग ) बुलढाणा जिल्हा प्रमुख पदी सौ. आशाताई रावणकार

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या महिला विभाग बुलढाणा जिल्हा प्रचार प्रमुख पदी सौ.आशाताई दिनेश रावणकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशाताई कित्येक दिवसांपासून अपंग व दिव्यांग लोकांचे कामे करून देतात. त्यामुळे त्यांना अपंग मित्र असही म्हटल्या जाते. हे त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेता. त्याची आज थेट महिला जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. या निवडीची घोषणा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष. माननीय सुभाष बसवेकर साहेब यांनी केली. व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. आशाताई यांचे पद मानद स्वरूपाचे असून. त्यांना भारतीय संविधान कायदे आणि महासंघाच्या आचार संहितेचे काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. सौ. आशाताई रावणकार यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 चां उपयोग व्यापक जनहितासाठी करावा. तसेच या कायद्याचा प्रसार व प्रचार सर्व सामान्य महिला नागरिकांपर्यंत व समाजामध्ये प्रभावी पने करावा . अशी अपेक्षा मा.श्री बसवेकर साहेब यांनी व्यक्त केली आहे. आशाताई यांच्या महिला जिल्हा प्रमुख या नियुक्ती मुळे. माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणी ला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.

विवरा येथील विज ग्राहकांना स्मार्ट मीटरचे अव्वा चे सव्वा बिल आल्याने डफडे वाजून ते बिल म.रा.वि वि कंपनी कार्यालयात शिवसेना (उबाठा) ने भिरकावून केला निषेध

मलकापुर:- तालुक्यातील विवरा येथील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविल्याने अव्वा चे सव्वा बिल आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून काल शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख हरीदास गणबास यांच्या नेतृत्वात विवरा येथील महिला व ग्रामस्थांनी डफडे वाजवून म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता आर.जी.तायडे यांच्या कार्यालयात ती बिले भिरकावून त्या वाढीव बिलाचा अनोखा निषेध केला आहे.
म.रा.वि.वि कंपनीच्या हुकूमशाही पद्धतीने सुव्यवस्थित असलेले ग्राहकांचे मीटर काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचा सपाटा सद्यस्थितीत जोरात सुरू आहे.विवरा येथील ग्रामस्थांना 400,500, 800 असे बिल पूर्वी येत असल्याने व आता स्मार्ट मीटर बसविल्याने ते बिल 2000,3000,5000,10000,13000 असे आल्याने अगोदरच विवरा येथे महिनाभरापूर्वी ढगफुटी होऊन शेतजमीन खरडून गेली व घरातील अन्नधान्याची ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यातच विज वितरण कंपनीने अव्वा चे सव्वा बिले देवून वायरमनने बिले भरण्याचा तगादा लावल्याने अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शंभर ते दीडशे ग्रामस्थ व महिलांना घेऊन विज कंपनी कार्यालयासमोर डफड वाजून अव्वाचे सव्वा आलेली बिले वीज वितरण कंपनी कार्यालयातच भिरकावली व जोपर्यंत विवरा येथील ग्रामस्थांची बिले दुरुस्त करून दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही बिले भरणार नाही व लाईट कापण्यास आलेल्या लाईनमनला चोप देण्याचा इशाराही यावेळेस शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांनी दिला आहे. यावेळी वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,प्रमोद गुलाबराव पाटील, किशोर भास्कर इंगळे, रोहन पाटील, ओम पाटील, संजय पाटील, रामदास तायडे, अशोक बोदडे,तुळशीराम ढोण, निना भगत, विनोद पाटील, नारायण सोनोने, राजू घुले,भरत सोनोने, संदीप बोदडे, संतोष तायडे,शिवाजी पाटील, रमेश चौधरी, लालसिंग पाटील, सविताबाई धांडे, मालुबाई तायडे, सत्यभामा सांगळकर, निर्मलाबाई चोपडे, मुकुंदा बोरले,निना वाडसे, शंकर वाडसे, शिवाजी पाटील, भास्कर सोनार सह असंख्य महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मलकापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : पाच उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली

मलकापूर प्रतिनिधी ।
मलकापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नामनिर्देशन मागे घेण्याची अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. नमुना ६ अन्वये एकूण पाच उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची नोंद जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील उमेदवारांनी आज दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी आपली उमेदवारी अधिकृतरीत्या मागे घेतली आहे :

  • शिला संजय वानखेडे, स्कूल ऑफ स्कॉलर जवळ, मुक्ताई नगर रोड, प्रभाग १-अ
  • चांद अब्दुल जब्बार, आंबेडकर नगर, प्रभाग ४-अ
  • दुर्गा राजकुमार वानखेडे, सुभाषचंद्र बोस नगर, प्रभाग ४-ब
  • यास्मिन बी शेख सलीम, पांढरी प्लॉट, पार्पेठ, प्रभाग ६-अ
  • शबाना बी मो. अकरम, कुरेश नगर, पार्पेठ, प्रभाग ६-अ

ही यादी निवडणूक कार्यालयातून अधिकृतरीत्या सहआयुक्त (नगर प्रशासन शाखा), जिल्हा कार्यालय बुलढाणा यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत जाहीर झालेल्या या नावांमुळे संबंधित प्रभागांतील निवडणूक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की, प्रक्रिया पूर्णतः नियमांनुसार पार पाडली असून प्राप्त माहितीप्रमाणे सर्व नोंदी पुढील टप्प्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत.

कासोद्यात यज्ञासाठी जनसागर उमळला

(अतीक खान कासोधा) जळगांव

नासिक जिल्हयातील डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुरड्या यज्ञावर नराधामाने अत्याचार करुन तीचा निर्घूणपणे खुन केल्याची राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ कासोदा ता.एरंडोल येथे मोठा निषेध मुकमोर्चा दि.२० रोजी स.१०-०० वाजेला येथील बिर्ला चौकापासून काढण्यात आला.

मुख्य रस्त्यावरुन पोलीस स्टेशनला हा मोर्चा नेण्यात आला,तेथे सपोनि निलेश राजपूत यांना दोन चिमुकलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

मोर्चात गावांतील सर्व संवेदनशील नागरीक,सर्व पक्षीय कार्यकर्ते,महिला, सर्वच शाळा,विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला,कुणी बैनर बनवून आणले,कुणी नराधमाला फाशी द्या,असे फलक बनवून आणले,तर कुणी काळ्या रंगाच्या रिबीन तोंडाला व हातावर बांधण्याकरिता स्वयंस्फूर्तीतून आणलेल्या होत्या.

मुक मोर्चा असल्याने कोणत्याही घोषणा-सुचना नव्हत्या,तरी देखिलअतिशय शिस्तीत हा मोर्चा होता.

चि.कु.यज्ञाला चीर शांती मिळो ही प्रार्थना.

सरकारने पत्रकारिता विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू : संदीप काळे

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अधिवेशनातील १५ ठरावांची तातडीने अंमलबजावणीची मागणी

मुंबई | प्रतिनिधी । ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे उत्साहपूर्ण आणि भव्य स्वरूपात पार पडले. राज्यातील विविध जिल्ह्यांतून तब्बल दोन हजारांहून अधिक पत्रकारांनी उपस्थित राहून या दोन दिवसीय अधिवेशनाला उल्लेखनीय प्रतिसाद दिला. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी केंद्रित या अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले.

अधिवेशनात पत्रकारांसाठी १० लाखांचा आरोग्य विमा आणि २५ लाखांचा अपघात विमा अनिवार्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच पत्रकार निवृत्तीवेतन योजना सुरू करणे, सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी २ टक्के राखीव कोटा ठेवणे, जिल्ह्यातील प्रेस-क्लबांचे आधुनिकीकरण आणि माहिती खात्याकडून ‘मीडिया सपोर्ट सेल’ स्थापन करणे यासारख्या निर्णयांना व्यापक पाठिंबा मिळाला. न्यूज पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, पत्रकारांवरील खोटे खटले मागे घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करणे आणि राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण अकादमी उभारणे या मागण्यांचाही ठरावात समावेश होता.

आपत्तीग्रस्त पत्रकारांसाठी तात्काळ मदत निधी, महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास, प्रवास भत्ता, मातृत्व रजा, क्रेच सुविधा आणि कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबतही अधिवेशनात एकमुखी ठराव संमत करण्यात आला. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विशेष पत्रकार सन्मान योजना सुरू करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

संघटनेने अधिवेशनात पारित केलेले सर्व १५ ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळाला प्रत्यक्ष भेटून सादर करणार असल्याची माहिती दिली. तसेच सर्व पालकमंत्र्यांना स्थानिक पातळीवर भेटून मागण्या पोहोचविण्यात येणार आहेत. सरकारने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व सरचिटणीस संदीप काळे यांनी दिला.

दहा वर्षांपासून फरार असलेला खूनाचा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

बुलढाणा, दि. 19 नोव्हेंबर 2025 :
बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील फरार आणि अभिलेखावरील पाहिजे आरोपींना शोधून अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा वर्षांपासून फरार असलेल्या खूनाच्या आरोपीसह आणखी एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे सन 2016 पासून फरार असलेला आरोपी शेख इरफान ऊर्फ काल्या शेख अश्पाक (वय 33, रा. मीलिंदनगर, बुलढाणा) याला आज दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी अटक केली. आरोपीवर पोलीस स्टेशन रायपूर येथे अपराध क्रमांक 16/2016 अंतर्गत कलम 302, 201, 120(ब) भादंवि नुसार खुनाचा गुन्हा दाखल असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर तो सतत फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी बुलढाणा शहरात आल्याचे समजताच पथकाने तात्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी रायपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात सोपविले.

याशिवाय, दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी दे. राजा पोलीस स्टेशनच्या अपराध क्रमांक 269/2024, कलम 309(6), 310 बी.एन.एस. मधील गुन्ह्यातून फरार असलेला आरोपी अभय दिलीप डोंगर (वय 24, रा. कन्हैय्या नगर, जालना) यालाही जालना येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला आवश्यक कार्यवाहीसाठी दे. राजा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, पोना. अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, पोकॉ गणेश वाघ, मनोज खरडे आणि मपोकॉ आशा मोरे यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे उत्तम उदाहरण मानली जात आहे.

जळगावला होणारे संविधान सन्मान संमेलन राज्याला दिशादर्शक मुकुंद भाऊ सपकाळे

(अतीक खान जळगांव)

भारतीय संविधान हा मानव मुक्तीचा जाहीरनामा असून मानवतेसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे.समताधिष्ठित समाज आकाराला यायचे असेल तर संविधान प्रत्येक नागरिकाच्या मनात रूजविणे गरजेचे आहे.
संविधानाचा सन्मान करणे , संविधानाचे संवर्धन करणे,आणि संविधानाची सुरक्षा करणे, जागरूक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.धर्मांध शक्ती पदोपदी संविधानाचा अपमान करत आहेत.अशा काळात संविधानाचा जाहीरपणे सन्मान करण्यासाठी हे संमेलन जळगाव नगरीत आयोजित केले आहे. या संमेलनातून राज्याला संविधान जागृतीची एक विधायक दिशा गवसणार आहे.यासाठी व्यापक प्रमाणात सर्वांनी संमेलनाची प्रसिद्ध करून संमेलन यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
ज्यांना अर्थबळ देणे शक्य आहे,त्यांनी पैसा उभा करावा, विचारवंतांनी, अभ्यासकांनी आपले लेख,भाषण, विचार याव्दारे संमेलनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.तर ज्यांना श्रम द्यायचे त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले पाहिजेत.असे आवाहन राज्यस्तरीय संविधान संमेलनाचे मुख्य संयोजक मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केले आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध विचारवंत, धुरंधर वक्ते, साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे असणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध व्यंगकवी संपत सरल,जयपूर यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोपाच्या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. संमेलनात परिसंवाद ,विविध सत्रे, कवी संमेलन, भाऊ थुटे यांचे राष्ट्र जागृतीचे कीर्तन, असे एकाहून एक सरस प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संमेलनाच्या जनजागृती करता व्यापक प्रमाणात प्रसिद्धीचे कार्य करावे. समाजातील सर्व घटकांनी युवक, महिला, शेतकरी, मजूर, कष्टकरी, नोकरदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवैधानिक विचार समजून घेण्यासाठी संमेलनामध्ये एकत्रित आले पाहिजे, असा राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाच्या आयोजन समितीचा मानस आहे.

प्रज्ञा दुसाने प्रकरणात सुवर्णकार समाज संतप्त; महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव पदाधिकाऱ्यांची आमदार चित्राताई वाघ यांच्याकडे निवेदन सादर

(अतीक खान जळगांव)

डोंगरगाव ता. मालेगाव, जि. नाशिक येथे केवळ चार वर्षांच्या निरागस प्रज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण सुवर्णकार समाजात संतापाची लाट उसळली आहे. या हृदयद्रावक घटनेचा तीव्र निषेध नोंदवत तसेच गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या आमदार आणि भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्राताई किशोरशेठ वाघ यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले.

या भेटीमध्ये पदाधिकाऱ्यांनी प्रज्ञा दुसाने प्रकरणाचा सखोल तपास, दोषींना कठोर शिक्षा तसेच अशा घटनांचा पुनरुच्चार होऊ नये यासाठी शासनाने कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली.

या प्रसंगी अध्यक्ष श्री. संजय विसपुते, उपाध्यक्ष श्री. विजय वानखेडे, सचिव श्री. संजय पगार, सौ. सीमाताई सुरेश भोळे, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ. रंजना वानखेडे, माजी नगरसेविका लताताई मोरे, मेळावा स्वागताध्यक्ष रमेशभाऊ वाघ, मेळावा प्रमुख सुभाष सोनार, नियोजन समिती प्रमुख शरदचंद्र रणधीर, श्री. भगवान दुसाने, सचिव प्रशांत विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.

सुवर्णकार समाजाने एकजुटीने या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

अर्ज बाद झाल्याने उमेदवाराचा संताप; प्रशासनावर मनमानीचा आरोप


(अतीक खान)मुक्ताईनगर)

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधील शिवसेना उमेदवार नितीन मदनलाल जैन यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या 18 तारखेला जारी केलेल्या परिपत्रकाचा दाखला देत अर्ज अवैध ठरवला. मात्र, चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा आरोप नितीन जैन यांनी केला आहे.

नितीन जैन यांनी शिवसेनेतर्फे प्रभाग 14 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या एबी फॉर्ममध्ये त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. छाननीसाठी सकाळी 11 वाजता प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते नगराध्यक्ष पदासाठीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनातही उपस्थित होते.

जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या एबी फॉर्मवरील पहिल्या क्रमांकावरील संजना चंद्रकांत पाटील आणि दुसऱ्या क्रमांकावरील भारतीय छोटू भोई यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक 14 च्या छाननीदरम्यान मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

या निर्णयाविरोधात नितीन जैन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत न्याय मिळवण्यासाठी पुढील कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

माझी लाडकी बहिन योजना की e-KYC की नई आखिरी तारीख घोषित, दिसंबर तक पूरी करें प्रक्रिया—नहीं तो रुक जाएगी ₹1,500 की मासिक सहायता


महाराष्ट्र सरकार की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना के लाभार्थियों के लिए एक महत्वपूर्ण निर्णय लिया गया है। प्राकृतिक आपदाओं और अन्य कारणों से कई eligible महिलाएँ समय पर e-KYC प्रक्रिया पूरी नहीं कर सकीं। इसे ध्यान में रखते हुए सरकार ने 18 नवंबर 2025 को समाप्त होने वाली e-KYC की अंतिम तिथि अब 31 दिसंबर 2025 तक बढ़ा दी है।

यह योजना महिलाओं को वित्तीय रूप से सशक्त बनाने के उद्देश्य से शुरू की गई है। 21 से 65 वर्ष की प्रत्येक पात्र महिला को ₹1,500 प्रतिमाह डीबीटी के माध्यम से प्रदान किए जाते हैं।

राज्य मंत्री अदिती तटकरे ने सोशल मीडिया पर बताया कि हाल के दिनों में आई आपदाओं के कारण कई बहनों को e-KYC में कठिनाई हुई। इन समस्याओं को गंभीरता से लेते हुए सरकार ने समयसीमा बढ़ाने का निर्णय लिया है।


e-KYC क्यों अनिवार्य है?

राज्य सरकार ने स्पष्ट किया है कि योजना का लाभ जारी रखने के लिए e-KYC अनिवार्य है। यदि कोई लाभार्थी निर्धारित समयावधि में आधार प्रमाणीकरण पूरा नहीं करती है, तो उसे मासिक आर्थिक सहायता प्राप्त नहीं होगी


विधवा और तलाकशुदा महिलाओं के लिए प्रक्रिया

जो महिलाएँ विधवा हैं या तलाकशुदा हैं, वे अपनी e-KYC के साथ निम्न दस्तावेजों की सत्य प्रतियाँ संबंधित जिले के महिला एवं बाल कल्याण अधिकारी को जमा करें—

  • पति/पिता का मृत्यु प्रमाणपत्र
  • तलाक प्रमाणपत्र या माननीय न्यायालय का आदेश

हर वर्ष e-KYC की आवश्यकता

लाडकी बहिन योजना की लाभार्थियों को हर वर्ष जून महीने से दो माह के भीतर अपना e-KYC अपडेट करना अनिवार्य है। समय पर प्रक्रिया पूरी न करने पर भुगतान रुक सकता है।


e-KYC कहाँ और कैसे करें?

सरकार ने आधार प्रमाणीकरण हेतु e-KYC सुविधा आधिकारिक पोर्टल पर उपलब्ध कराई है:
https://ladakibahin.maharashtra.gov.in

e-KYC की आसान प्रक्रिया

चरण 1: वेबसाइट पर जाएँ – https://ladakibahin.maharashtra.gov.in
चरण 2: होमपेज पर दिए गए e-KYC के बैनर पर क्लिक करें।
चरण 3: आधार नंबर व कैप्चा भरकर OTP भेजें।
चरण 4: यदि आधार मंजूर सूची में है तो आगे की प्रक्रिया खुलेगी, अन्यथा संदेश आएगा—
“आपका आधार नंबर माझी लाडकी बहिन योजना की पात्र सूची में उपलब्ध नहीं है।”
चरण 5: OTP भरकर सबमिट करें।
चरण 6: पति/पिता का आधार नंबर भरें, कैप्चा डालें और OTP सत्यापित करें।
चरण 7: इसके बाद लाभार्थी को—

  • जाति श्रेणी चुननी होगी
  • निम्न घोषणाएँ देनी होंगी:
    • परिवार में कोई भी सदस्य सरकारी/अर्ध-सरकारी/PSU में नियमित कर्मचारी या पेंशनभोगी नहीं है।
    • परिवार में केवल 1 विवाहित व 1 अविवाहित महिला ही लाभ ले रही है।
      चरण 8: अंतिम सबमिट करने पर संदेश दिखाई देगा—
      “Success – Your e-KYC verification has been successfully completed.”

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी जिल्हा संपर्क कार्यालयात विनम्र अभिवादन

मलकापुर प्रतिनिधि। आदिल
मलकापुर:- हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना 13 व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा संपर्क कार्यालय अभिवादन करण्यात आले.
मलकापूर येथील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरीदास गणबास सह आदिं पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज दि.17 नोव्हेंबर 25 रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले, यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, उपशहरप्रमुख शकील जमादार,कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, विभागप्रमुख सत्तार शाह, विभागप्रमुख चाॅद चव्हाण, उखर्डा तांदूळकर, अनिल श्रीखंडे, रमेश जामोदे, मुश्ताक जमादार, राहुल गणबास,राष्ट्रपाल नरवाडे, अविनाश सावळे सह आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मुक्ताईनगर : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; प्रशासनाची धावपळ

(अतीक खान )मुक्ताईनगर
मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडे केवळ पाच तासांचा कालावधी उरला असून या अल्प वेळेत मोठ्या संख्येने अर्ज कसे हाताळायचे, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहणार आहे.

नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतून १७ नगरसेवक निवडायचे आहेत. मागील सहा दिवसांत एकूण ६६ अर्ज दाखल झाले आहेत. यात

नगराध्यक्षपदासाठी : ६ अर्ज

नगरसेवक पदासाठी : ६० अर्ज

असे अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील ऑनलाइन तपासणीत आज सकाळपर्यंत १८७ अर्ज भरलेले दिसत आहेत, मात्र हे अर्ज अद्याप प्रशासनाकडे प्रत्यक्ष दाखल झालेले नाहीत. त्यामुळे हे सर्व अर्ज आजच दाखल होतील, अशी शक्यता आहे.

यामुळे अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाची मोठी धावपळ होणार असून कर्मचाऱ्यांवर ताण वाढणार आहे.

शाहीन उर्दू हायस्कूल, मेहरूण जळगाव येथे इयत्ता 5वी ते 12वीचा प्रथम सत्र निकाल वितरण समारंभ उत्साहात पार

जळगाव — शाहीन उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मेहरूण येथे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रथम सत्र निकाल वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. सकाळपासूनच निकाल घेण्यासाठी 11 आणि 12 वी च्या पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकतेचे मिश्र भाव दिसत होते. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनती बद्दल कौतुक केले.कार्यक्रमात शिक्षकांनी प्रत्येक वर्गाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक मन लावून अभ्यास करण्याचे, नियमित पुनरावृत्ती करण्याचे आणि आगामी परीक्षांसाठी अधिक तयारी करण्याचे मार्गदर्शन केले. विशेषतः 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या अनुशंगाने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. मुख्याध्यापकांनी श्री.काझी जमिरुद्दीन यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांची तिहेरी जबाबदारी महत्त्वाची आहे. नियमितता, शिस्त आणि कष्ट हेच यशाची गुरुकिल्ली आहेत.” तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.समारोपात शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षकवर्गाच्या व परीक्षा विभागाच्या मेहनतीचे कौतुक केले आणि शैक्षणिक गुणवत्तेत आणखी वाढ करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी इकरा बी एड कॉलेजचे इंटरनशिपचे विद्यार्थीही उपस्थित होते.

अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा 35 वर्षानंतर स्नेह मेळावा

संदीप जोगी | मुक्ताईनगर

तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ. तराळ विद्यालयातील सन 1990 च्या बॅचच्या 22 वर्ग मित्र-मैत्रिणीचा तब्बल 35 वर्षांनी स्नेह मेळावा नुकताच बऱ्हाणपूर येथील एनएसीएल हॉटेलमध्ये नुकताच संपन्न झाला.

अंतुर्ली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाच्या प्रांगणात सन 1990 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन शाळेच्या प्रगती विषयी हितगुज केले. त्यानंतर बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथील एनएसीएल हॉटेलमध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम मृत झालेल्या वर्ग मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वांनी स्वतः बद्दल व आपापल्या परीवारा विषयी माहिती दिली. वर्ग मित्रांमधील काही प्रगतशील शेतकरी,शिक्षक,प्राध्यापक,व्यावसायिक ,मोठे उद्योजक , इंजिनीयर, लोको पायलेट या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. स्नेह मेळाव्यात संगीत खुर्ची ,डान्स, गाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 35 वर्षांनी भेटत असलेली काही बालमित्र तर काही दहावीपर्यंत शिकणाऱ्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी मनसोक्त सुखदुःखाच्या गप्पा मारून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. स्नेह भोजनानंतर स्नेह मेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. दरवर्षी स्नेह मेळावा घेण्याचा निश्चय करण्यात आला तसेच वृक्षारोपण, सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेण्याचा प्रण यावेळी सर्व वर्ग मित्रांनी घेतला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापिका कल्पना बोरसे – हुरपडे अकोला तर संचालन व आभार विनायक वाडेकर यांनी केले.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : वार्ड क्रमांक 11 मधून शेख शकील शेख मोसा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

(अतीक खान मुक्ताईनगर)

मुक्ताईनगर आगामी नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 11 मधून लोकप्रिय व उत्साही उमेदवार शेख शकील शेख मोसा यांनी आज अधिकृतपणे आपला नामांकन अर्ज नगरपंचायत कार्यालयात दाखल केला. निवडणूक अधिकारी तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केला.

नामांकन अर्ज दाखल करताना शेख शकील यांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने व उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे शेख शकील यांनी या प्रसंगी सांगितले.

वार्ड क्रमांक 11 मधील नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रवेशामुळे या प्रभागातील निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेख शकील शेख मोसा यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात उत्सुकता आणि राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.