मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांना हक्काचे मानधन रु.२३,०००/- तत्काळ द्या….

img 20251128 wa0019
img 20251128 wa0019
Advertisement

मलकापूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा वर्षा आधी याच दिवशी मुख्यमंत्रीपदाच्या शपथ घेतली होती, त्याची औचित्य साधून मलकापूर तालुका शिवसेना यांनी आशा वर्कर अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा दिल्याबद्दल शासनाने जाहीर केलेला प्रोत्साहनपर भत्ता तत्काळ अदा करण्याबाबत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मलकापूर तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. त्यामध्ये मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महाआयुष सर्वे करणे, कोविड-१९ संबंधित ईतर कामे” अहोरात्र मेहनत घेऊन जिवाची पर्वा न करता काम केले. त्या अनुषंगाने सर्वांना मानधना व्यतिरिक्त कोरोना काळातील २३ महिन्यांसाठी दरमहा १०००/- रु. रक्कम प्रोत्साहनपर भत्ता “शासन परीपत्रक गा.वि.वि.क्र. चोविआ – २०२०/प्र/क्र.४२/वित्त-४ दि. ३१ मार्च २०२०” प्रमाणे देण्याचे आदेश ग्रामपंचायत अधिकारी यांना दिलेले होते.
तरी आजवर मलकापूर तालुक्यामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेवीका, अंगणवाडी मदतनीस यांना ग्रामपंचायत मार्फत प्रोत्साहनपर भत्ता मिळालेला नाही.
कोरोना काळात दिलेल्या सेवेचा मोबदला रक्कम रु.२३,०००/- प्रत्येकाला तत्काळ वितरित करावा, अन्यथा शिवसेना मलकापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल नंतरच्या परिणामास शासन जबाबदार राहील, असा ईशारा शिवसेने तर्फे देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी प्रा. रुपाली रमेशराव पाटील, राजेंद्र काजळे, शंतनु कांडेलकर, शिवाजी घारोडे, गजानन काळे, प्रतूष चौधरी यांच्या सह तालुक्यातील असंख्य आशा वर्कर तथा ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते.

Subscribe to Viral News Live