बुलढाणा – मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा पथकाने दि. 23.11.2025 रोजी उपविभागातील पेट्रोलिंग दरम्यान एका महत्त्वाच्या कारवाईत गांजा अंमली पदार्थाबाबत संशयित व्यक्तीला जेरबंद केले. जय हॉटेलजवळील गोंधनखेड शिवार, पोलीस ठाणे बुलढाणा ग्रामीण हद्दीत, संशयित गणेश मेरसिंग साबळे (वय 42, रा. तरोडा, तारापुर रोड, ता. मोताळा) हा लाल रंगाच्या बजाज डिस्कवर मोटारसायकलवरून नायलॉन थैली बाळगत असताना आढळून आला. संशयास्पद हालचाली पाहून पथकाने एन.डी.पी.एस कायद्याच्या तरतुदीनुसार पंचासमक्ष झडती घेतली.
झडतीत नायलॉन थैलीत हिरवट, काळसर, कळीदार बिजासह अंदाजे 2.50 किलो वजनाचे गांजा आढळले, ज्याची एकूण किंमत 41,000/- रुपये होती. तसेच संशयिताच्या खिशात एक जिओ मोबाईल (किंमत अंदाजे 1,000/- रुपये) व गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (क्र. MH28AK 1891, किंमत 15,000/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 57,000/- रुपयांचा मुददेमाल ताब्यात घेतला गेला. संशयिताविरुद्ध पोलीस ठाणे बुलढाणा ग्रामीण येथे एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईत आणखी एक आरोपीही आरोपी म्हणून नाव नोंदविण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई श्री. निलेश तांबे, पोलीस अधीक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली गेली. कारवाई पथकात पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, विजय पैठणे, पोना सुनिल मिसाळ, अनंत फरताळे, पोकॉ गजानन गोरले, अमोल वानरे, चापोका निवृत्ती पुंड, रवि भिसे यांचा समावेश होता.






