*जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ जाहीर*
*कर्णधारपदी अमळनेरचा अरशद शेख तर उपकर्णधार पदी जैन स्पोर्ट्स चा कौशल पवार*
पुणे येथे १५ जून पासून सुरू होत असलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेसाठी ७ दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामधून वीस खेळाडूंचा अंतिम संघ निवडण्यात आला असून त्याची घोषणा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी केली.
याप्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांना निरोप देण्यात आला यावेळी संघटनेचे सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज सुरवाडे, संघ व्यवस्थापक भुसावळ रेल्वेचे नितीन डेविड व प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांची उपस्थिती होती.
*निवड झालेले खेळाडू*
जेन स्पोर्ट्स अकॅडमी चे सुरज सपके,अर्पित वानखेडे, दीपक सस्ते, संजय कासदेकर, पवन सपकाळे, कौशल पवार व धनंजय धनगर.
विनीत फुटबॉल क्लबचे पियुष मोजे, पंकज पाटील,
पोलीस बॉईज- अल्तमश खान व वसीम शेख.
मु. जे.कॉलेज चे – निखिल पाटील,अमेय तळेगावकर व निरज पाटील
अमळनेरचे- वसीम शेख व अर्शद शेख.
किरण स्पोर्टिंग क्लब भुसावळ चे -इरफान शेख,
प्रतीक निले.मोहम्मद बिलाल व पीटर डिसूजा
संघ व्यवस्थापक म्हणून भुसावळ रेल्वेचे नितीन डेव्हिड तर प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे
अब्दुल मोहसिन यांची निवड करण्यात आली.
फोटो कापशन
निवड झालेले खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून नितीन डेविड, फारुक शेख मनोज सुरवाडे व अब्दुल मोहसीन दिसत आहे