नवीन नेतृत्वाला जिल्ह्यात उत्साहाचे स्वागत‘voice of media’ बुलढाणा जिल्ह्यात दोन संयुक्त जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

नवीन नेतृत्वाला जिल्ह्यात उत्साहाचे स्वागत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ बुलढाणा जिल्ह्यात दोन संयुक्त जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
नवीन नेतृत्वाला जिल्ह्यात उत्साहाचे स्वागत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ बुलढाणा जिल्ह्यात दोन संयुक्त जिल्हाध्यक्षांची नियुक्ती
Advertisement

बुलढाणा :
जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘voice of media’ संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी यंदा दोन अनुभवी पत्रकारांची संयुक्त निवड करण्यात आली आहे. ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक वैभवराजे मोहिते आणि ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार हे दोघेही मिळून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन पंढरपूर येथे सुरू असून, याच अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी या महत्त्वपूर्ण निवडीची घोषणा केली. नव्या कार्यरचनेनुसार बुलढाणा जिल्ह्याला प्रथमच संयुक्त जिल्हाध्यक्ष मिळत असल्याने संघटनेच्या कामकाजाला नव्या वेगाची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

यापूर्वी पद भूषवणारे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर नवीन नियुक्तीची प्रतीक्षा सुरू होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय जाहीर केला होता. पंढरपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आणि सर्वानुमते मोहिते व पवार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले.

जिल्ह्यात सकारात्मक वातावरणाची निर्मिती

नव्या नेतृत्वाबाबत पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. मोहिते हे ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक तर पवार हे अनुभवी पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अनुभवामुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळेल आणि संघटनेची कामे अधिक प्रभावीपणे राबवली जातील, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Subscribe to Viral News Live