पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे “महिलांच्या कायदेशीर हक्क व संरक्षण कायदे” विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम

Advertisement

मलकापूर: पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथे महिला विकास समिती तर्फे “महिलांच्या कायदेशीर हक्क व संरक्षण कायदे” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. एस. एस. मोरे आणि अॅड. अभिजीत घुले हे प्रतिष्ठित विधिज्ञ उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या हक्कांविषयी, समाजातील विविध स्तरांवर महिलांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाविषयी तसेच महिलांवरील अत्याचारांविरुद्ध कायद्याने उपलब्ध उपाययोजनांविषयी सखोल माहिती दिली.
अॅड. मोरे यांनी आपल्या भाषणात ‘महिलांना न्याय मिळविण्यासाठी कायदे जाणून घेणे हीच खरी शक्ती आहे’ असा संदेश देत महिलांना आत्मनिर्भर आणि सजग राहण्याचे आवाहन केले. अॅड. अभिजीत घुले यांनी घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा, कार्यस्थळावरील लैंगिक छळविरोधी कायदा, महिलांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असलेले भारतीय दंड संहिता कलम तसेच पोलिसांमार्फत मिळणाऱ्या तातडीच्या मदतीविषयी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिला सक्षमीकरण हे आधुनिक समाजाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात असे मत व्यक्त केले.या उपक्रमाचे संयोजन महिला विकास समितीच्या समन्वयक प्रा. शारदा लांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन महिला विकास समिती अंतर्गत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकारी शिक्षक वृंद — प्रा. प्रगती चौधरी, प्रा. माधुरी राजपूत, प्रा. वैश्णवी चोपडे, प्रा. दीप्ती लढे, प्रा. माधुरी चौधरी, मिस. निकिता धगे आणि श्रीमती सुलभा पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच इतर सहकारी कर्मचारी यांनी देखील कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले.

Advertisement

महाविद्यालयातील महिला विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थिनींनी मार्गदर्शकांकडून मिळालेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा प्रकारचे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रगती चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वैश्णवी चोपडे यांनी केले.महिला विकास समितीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, प्राचार्य डॉ. खर्चे यांनी यापुढेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी, कायदेविषयक जागरूकतेसाठी व स्वसंरक्षणासाठी अशा कार्यक्रमांचे सातत्य ठेवण्याचे आश्वासन दिले.

Subscribe to Viral News Live