मुक्ताईनगर प्रतिनिधी…. येथील श्रीमती जी . जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष हिवाळी शिबिर” प्रसंगी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना ना. रक्षा खडसे (केंद्रीय राज्यमंत्री, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्व स्वयंसेवकांना भारत सरकारच्या ‘माय भारत ’या योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना या एकका विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना या भारत सरकारच्या योजनेतून सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व व्यक्तिमत्व विकासाचा विकास आशा शिबिरातून होत असतो. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना हे केवळ एक युनिट नसून संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. जे आपल्याला श्रमदान, स्वच्छता अभियान, राष्ट्र उभारणीसाठी आपण दिलेले योगदान, व आपल्याला जे दररोज बौद्धिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांचे व्याख्यान मिळते. त्यातून आपण प्रबळ व सक्षम बनाल अशी मी अशा व्यक्त करते असे आवर्जून त्यांनी सांगितले. व सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय साळवे हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना शिबिराविषयी व शिबिरातील कार्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी घोडसगाव येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.दीपक बावस्कर, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. कृष्णा गायकवाड, व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.रंजना झिंजोरे व सर्व स्वयंसेवक यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले मार्गदर्शन.
Advertisement
Subscribe to Viral News Live





