मुक्ताईनगर नवीन मुक्ताई मंदिर परिसरात भव्य क्रीडा संकुल……केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची माहिती.

मुक्ताईनगर नवीन मुक्ताई मंदिर परिसरात भव्य क्रीडा संकुल......केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची माहिती.
Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी…. मुक्ताईनगर येथे युवक युवती तसेच तरुणांना हक्काचे क्रीडांगण नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. भविष्यात मुक्ताईनगर नवीन श्री संत मुक्ताई मंदिराजवळ भव्य असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.
शुक्रवारी सायंकाळी कोथळी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना नामदार खडसे यांनी माहिती दिली.
जुने मुक्ताई मंदिर परिसरात शालेय विद्यार्थी नशेचे इंजेक्शन घेत असल्याचे वास्तव असून पन्नीच्या दारूच्या आहारी सुद्धा विद्यार्थी गेलेले आहे. ही एक खंत असून याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कोथळी येथील मुक्ताई मंदिराच्या भोवताली मोठ्या प्रमाणात बॅक वॉटरवर जलपर्णी वाढलेली आहे. याविषयी मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असून लवकरच पाण्यातील जलपर्णी काढण्याचे टेंडर निघेल असेही केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रसंगी राज्यमंत्री श्रीमती खडसे यांचे स्वीय सहाय्यक तुषार राणे, पंकज भारंबे, विनायक पाटील उपस्थित होते.
—- शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांनी जुने मुक्ताई मंदिर परिसरामध्ये भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील ,हवालदार अमोल जाधव उपस्थित होते.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here