मुक्ताईनगर प्रतिनिधी,–तालुक्यातील घोडसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा एककाच्या विशेष हिवाळी शिबिराप्रसंगी एककातील सर्व स्वयंसेवकांनी श्रमदानातून दत्तक गाव घोडसगाव गावी बंधारा बांधला. देशाच्या जडणघडींमध्ये सुपीक जमिनीचे अतिशय महत्त्व असून त्यासाठी सर्व स्वयंसेवकाने स्वतः या बंधाऱ्याचे कार्य हाती घेऊन बंजारा बांधला. तर सकाळच्या प्रभात फेरी मधे तंबाखूमुक्त भारत,नशा मुक्त भारत यामधून संकल्पनेतून संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढून पथनाट्य सादर केले. गीत गायनातून तंबाखूचे दुष्परिणाम हे ग्रामस्थांना पटवून दिले.
दुपारच्या बौद्धिक क्षेत्रामध्ये ‘सुपोषित भारत’या विषयावर डॉ. अमित गडेकर (तालुका आरोग्य अधिकारी मुक्ताईनगर) व डॉ. रत्नप्रभा गडेकर (ग्रुपचे समुदाय आरोग्य अधिकारी पिंपरी आकाराऊत) सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून सुपोषित म्हणजे ‘चांगले पोषण मिळालेला’ किंवा ‘आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण’ असा व्यक्ती, प्राणी किंवा ठिकाण होय; याचा अर्थ शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळणे, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते, वाढ होते आणि ऊर्जा मिळते. सुपोषित व्यक्ती निरोगी, सशक्त आणि सक्षम असते असे त्यांनी आवर्जून सांगितले.
तर दुपारील दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. प्रमोद मेश्राम (तालुका सिकलसेल सहाय्यक मुक्ताईनगर) यांनी “सिकलसेल आजार जनजागृती व समुपदेशन“ या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना सिकलसेल या मानवी आजाराबद्दल मार्गदर्शन केले. सिकलसेल आज समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये त्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जर दोन (स्त्री-पुरुष) सिकलसेल वाहक यांचा विवाह झाला तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर भोगावे लागतात.म्हणून सिकलसेल दोन व्यक्तीने एकत्र विवाह करू नये असेही आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा अधिकारी डॉ.डी. एन. बावस्कर सह अधिकारी डॉ. कृष्णा गायकवाड, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.रंजना झिंजोरे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी श्रमदानातून बांधला बंधारा
Advertisement
Subscribe to Viral News Live




