मुक्ताईनगर प्रतिनिधी…. येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे पदग्रहण 12 जानेवारी रोजी लोकनियुक्त नगराध्यक्षा संजनाताई चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे. दुसऱ्या दिवशी 13 जानेवारी मंगळवार रोजी विशेष सभेत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व दोन स्वीकत सदस्यांची निवड प्रक्रिया नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये नगराध्यक्षा संजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

उपनगराध्यक्षपदी देवयानी निलेश शिरसाट यांची तर स्वीकृत नगरसेवक पदी छोटू भोई व नितीन (बंटी) जैन यांची निवड बहुमताने झाली असल्याचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश पुडके यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये निवड झालेल्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा, दोन स्वीकृत नगरसेवक तसेच सर्व नगरसेवक , नगरसेविका यांना शुभेच्छा दिल्या. फटाक्यांच्या आतिश बाजीत शिवसेना कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.





