मलकापूर तालुक्यातील ई – पिक पहाणी न झालेल्या शेतकऱ्यांना शेतातील माल विकण्याकरिता होणाऱ्या अडचणी सोडावा

Advertisement

मलकापूर: आज दिनांक १०/१२/२५ बुधवार रोजी मलकापूर तालुक्यातील ई – पिक पहाणी न झालेल्या शेतकऱ्यांना शेतातील माल विकण्याकरिता होणाऱ्या अडचणींबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मलकापूर तालुक्याच्या वतीने मलकापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या अधीनस्त असलेल्या तलाठींच्या निष्काळजी व काम चुकारपणा मुळे मलकापूर तालुक्यातील बऱ्यांच शेतकऱ्यांची “ई पिक पहाणी” झाली नाही त्यामुळे, आता शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल शासकिय खरेदी केंद्रा मध्ये विकण्याकरिता नोंद करण्यात अडचणी होत आहे. कास्तकार अतिशय हवालदिल झाला आहे तरी, त्याबाबत तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी दिपक चांभारे पाटील शिवसेना तालुकाप्रमुख यांनी केली आहे. निवेदन देते वेळी सोपानरावजी शेलकर, रामभाऊ थोरबोले, मधुभाऊ इंगळे, रामराव तळेकर, बळीराम वानरे, विजय मोरे, मधू चित्रंग, अशोक वानखेडे, वैभव भोपळे व ईतर शिवसैनिक उपस्थित होते.

Subscribe to Viral News Live