बुलढाणा जिल्ह्याचे ” मातृतीर्थ बुलढाणा ” असे नामकरण करा . क्षत्रिय मराठा फाऊंडेशन ची मागणी

Advertisement
बुलढाणा जिल्ह्याचे ” मातृतीर्थ बुलढाणा ” असे नामकरण करा . क्षत्रिय मराठा फाऊंडेशन ची मागणी
खामगांव : तमाम मराठी जनांचे आराध्य दैवत तथा भारतभूमी आणि विशेष करून. महाराष्ट्र भूमी परकीय आक्रमणाच्या गुलामगिरी मध्ये असताना. छत्रपती शिवाजी महाराज सारख्या दैत्य मान महापुरुषाला जन्म देऊन. ही भूमी स्वतंत्र करून घेणाऱ्या मांसाहेब जिजाऊ यांची मातृतीर्थ बुलढाणा ही जन्मभूमी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावात. महावीर पराक्रमी श्रीमंत लखुजीराजे जाधवराव यांच्या पोटी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां साहेब जन्माला आल्या. यात शिंडखेड राजा ला सर्व महाराष्ट्र मातृतीर्थ म्हणून ओळखतो. या करिता फक्त सिंदखेड राजा च नाही तर संपूर्ण बुलढाणा जिजाऊ मां साहेब यांच्या नावाने ओळखला जावा म्हणून. क्षत्रिय मराठा फाऊंडेशन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष. प्रा विजय दादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली. नायब तहसीलदार साहेब खामगांव. यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन द्वारे बुलढाणा जिल्हा. या आधी मातृतीर्थ बुलढाणा असे नामकरण करावे. या साठी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी क्षत्रिय मराठा फाऊंडेशन चे जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ इंगळे. खामगांव तालुका अध्यक्ष दिनेशभाऊ रावणकार . व क्षत्रिय मराठा फाऊंडेशन चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Subscribe to Viral News Live