मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवकाकडून घरकरांमध्ये 50% सूट देण्याच्या शासन निर्णयाची अवहेलना

img 20251204 wa0007
img 20251204 wa0007
Advertisement

ग्रामस्थांना घरकरांमध्ये 50% सुट न दिल्यास सोमवारी डफडे बजाव आंदोलन करून ग्रा.प कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) इशारा

मलकापुर:- मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक रहिवासी ग्रामस्थांना थकीत कर एक रकमी भरल्यास त्यात 50 टक्के सूट देण्याचा शासन निर्णय असताना सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी करीत नसल्याने ग्रामस्थांवर आर्थिक भार पडत असून त्या शासन निर्णयाची तीन दिवसात अंमलबजावणी न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करून आमरण उपोषण करण्याचा इशारा गटविकास अधिकारी नारखेडे यांना आज शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थकीत कर वसुली रक्कम एक रकमी भरल्यास त्याला 50% टक्के रक्कम सुट देण्याचा शासन निर्णय दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामविकास व पंचायत राज विभाग क.श्री.पोतदार उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढला आहे‌. शासन निर्णय काढून तब्बल एक महिना उलटला असून त्याची संपण्याची मुदत दि. 31 डिसेंबर 25 आहे. मात्र मलकापूर तालुक्यातील मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक या योजनेपासून ग्रामस्थांना वंचित ठेवत असून ग्रामस्थांना घरकरामध्ये 50% ची सूट दिली नाही योजनेला 25 दिवसांचा अल्प कालावधी शिल्लक असून आज दि.04 डिसेंबर 25 रोजी शिवसेना (उद्धवसाहेब ठाकरे) सेनेचे जिल्हा उपप्रमुख गजानन ठोसर, शहर प्रमुख हरिदास गणबास यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी पंचायत समिती नारखेडे यांना निवेदन देऊन मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील करदात्यांना तिन दिवसांत 50 टक्के सूट देऊन कर वसुली करण्यात यावी अन्यथा दि. 8 डिसेंबर 25 सोमवार रोजी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालय समोर डफडे बजाव आंदोलन करून आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास, युवासेना शहर प्रमुख मंगेश सातव, अल्पसंख्यांक सेना उपजिल्हाप्रमुख सै. वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, शिवसेना विभाग प्रमुख चांद चव्हाण, विभाग प्रमुख सत्तार शाह, शेख मोहसीन शेख छोटू,शे.रफीक शे.गफ्फार, रहीम सै.करीम, शेख शफिक शेख रफिक, समीर खान, शे शब्बीर शे बुडन,शेख सलीम शेख रहमान, चांदखा गफूर खा,शोयब खान अफजल खान, बिलाल खान सुलेमान खान, शेख अबरार शेख अहमद, शेख इमरान शेख अय्युब ,रईस खान नवाजखान, नाजिम शेख सह शिवसेना पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Advertisement
Subscribe to Viral News Live