प्रतिनिधी चिखली
चिखली तालुका येथील सातगाव भुसारी मृतक गणेश प्रल्हाद पवार यांचा काही दिवसांपूर्वी चिखली रोडवर माऊली पेट्रोल पंपाजवळ अपघाती निधन झाला होता. त्यांचे स्टेट बैंक केळवद येथे खाते होते. तसेच त्यांनी वैयक्तिक ५०० रुपयांचा अपघात विमा काढलेला होता. दरम्यान, स्टेट बँकाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला क्षेत्रीय प्रबंधक इन्शुरन्स संतोष लाला बंडीवार , शाखा प्रबंधक गिरीश गुजर , असिस्टंट इन्शुरन्स मॅनेजर अक्षय जवादे यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश मृतकची आई चंद्रकला प्रल्हाद पवार यांना सुपूर्द करण्यात आले.
गणेश प्रल्हाद पवार हे त्यांच्या आई वडिलांना एकच मुलगा होता त्यांची पत्नी अश्विनी व मुलगी एक महिन्याची आहे दीड ते दोन वर्षा पहिलेच त्यांचे लग्न झालेले होते . व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या अकाली अपघाति मृत्यूमुळे कुटुंबावर निराशेचा सावट निर्माण झाला एक एकर शेती असताना कुटुंबाची उदरनिर्वाहची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती त्यातच त्यांनी मागच्या वर्षी २०२४ ते २०२५ मध्ये स्टेट बँक मधून ५०० ची इन्शुरन्स पॉलिसी अपघाती विमा घेतला होता कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असताना गणेश पवार यांच्या पॉलिसीमुळे कुटुंबाला आधार मिळाला . ते सातगाव भुसारी मधील रहिवासी असून यांचे केळवद येथील स्टेट बँकेत मध्ये खाते होते. तसेच त्यांनी स्टेट बँकेत वार्षिक पाचशे रुपये भरून १० लाखांचा अपघाती विमा काढलेला होता. काही दिवसापूर्वी अपघाती मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या कुटुंबाला स्टेट बँकेच्या वतीने १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्व करण्यात आला आहे. विशेषता बँक अधिकारी यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून कुटुंबाला सदर लाभ मिळून दिला शाखाधिकारी गिरीश गुजर , कॅशियर अशोक घुगे , सहाय्यक शुभांगी आंबेकर , पृथ्वीराज चव्हाण , फकीरा हिवाळे सातगाव भुसारी येथील अनिल गाडे , बाबुराव देशमुख , भारत घाटगे, संतोष थोरात , एकनाथ कंकाळ , सुनिता सोनाळकर आधी उपस्थित होते .
अपघाती विमा काढण्याचे आवाहन
भारतीय स्टेट बँकेचे १८ ते ६० वर्ष वयोगटातील बचत खातेदारांचा नाममात्र एक हजार रुपयात २० लाखाचा अपघाती विमा काढण्यात येतो. दोन हजारात ४० लाखाचे विमा संरक्षण कवच बँकेकडून सामाजिक बांधिलकी उपक्रमातंर्गत जाते. या अपघाती विमा योजनेचा खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा प्रबंधक गिरीश गुजर यांनी केले आहे.


