प्रतिनिधी बुलडाणा
सिंदखेड राजा तालुक्यातील चोरपांग्रा येथील रंजना संदीप चव्हाण (वय ५२) यांचा काही दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना वीज पडून दुर्दैवी निधन झाला होता. रंजना संदीप चव्हाण यांचे बिबी येथील भारतीय स्टेट बँकेत खाते असून त्यांनी फक्त १००० रुपयांचा अपघाती विमा घेतलेला होता. या विम्याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला तब्बल २०,००००० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.या धनादेशाचे सुपूर्दगिरी कार्यक्रम स्टेट बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या वेळी शाखा प्रबंधक दिलीप पवार , कॅशियर पंकज डांगे , फिल्ड ऑफिसर सागर उटाणे , शशांक कडेवे , ज्ञानेश्वर लिंगायत , मनोज बोरे , देविदास गाढवे , प्रवीण मोरे , अंकित साळवे , इत्यादींची उपस्थिती होती तसेच शाखा प्रबंधक दिलीप पवार यांच्या हस्ते मृतकाचा मुलगा संदीप चव्हाण यांना धनादेश देण्यात आला.
अपघाती विमा काढण्याचे आवाहन
भारतीय स्टेट बँकेच्या वतीने १८ ते ६० वर्षे वयोगटातील बचत खातेदारांसाठी अत्यल्प प्रीमियममध्ये अपघाती विमा योजना राबवण्यात आली आहे. फक्त १ हजार रुपयात २० लाखांपर्यंत, तर २ हजार रुपयात ४० लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळू शकते. या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचा लाभ सर्व खातेदारांनी घ्यावा, असे आवाहन शाखा प्रबंधक दिलीप पवार यांनी केले.

