मलकापुर:- तालुक्यातील विवरा येथील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविल्याने अव्वा चे सव्वा बिल आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून काल शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख हरीदास गणबास यांच्या नेतृत्वात विवरा येथील महिला व ग्रामस्थांनी डफडे वाजवून म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता आर.जी.तायडे यांच्या कार्यालयात ती बिले भिरकावून त्या वाढीव बिलाचा अनोखा निषेध केला आहे.
म.रा.वि.वि कंपनीच्या हुकूमशाही पद्धतीने सुव्यवस्थित असलेले ग्राहकांचे मीटर काढून त्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचा सपाटा सद्यस्थितीत जोरात सुरू आहे.विवरा येथील ग्रामस्थांना 400,500, 800 असे बिल पूर्वी येत असल्याने व आता स्मार्ट मीटर बसविल्याने ते बिल 2000,3000,5000,10000,13000 असे आल्याने अगोदरच विवरा येथे महिनाभरापूर्वी ढगफुटी होऊन शेतजमीन खरडून गेली व घरातील अन्नधान्याची ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यातच विज वितरण कंपनीने अव्वा चे सव्वा बिले देवून वायरमनने बिले भरण्याचा तगादा लावल्याने अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांना दिल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शंभर ते दीडशे ग्रामस्थ व महिलांना घेऊन विज कंपनी कार्यालयासमोर डफड वाजून अव्वाचे सव्वा आलेली बिले वीज वितरण कंपनी कार्यालयातच भिरकावली व जोपर्यंत विवरा येथील ग्रामस्थांची बिले दुरुस्त करून दिल्या जात नाही तोपर्यंत आम्ही बिले भरणार नाही व लाईट कापण्यास आलेल्या लाईनमनला चोप देण्याचा इशाराही यावेळेस शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांनी दिला आहे. यावेळी वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, शिवसेना विभाग प्रमुख सत्तार शाह,प्रमोद गुलाबराव पाटील, किशोर भास्कर इंगळे, रोहन पाटील, ओम पाटील, संजय पाटील, रामदास तायडे, अशोक बोदडे,तुळशीराम ढोण, निना भगत, विनोद पाटील, नारायण सोनोने, राजू घुले,भरत सोनोने, संदीप बोदडे, संतोष तायडे,शिवाजी पाटील, रमेश चौधरी, लालसिंग पाटील, सविताबाई धांडे, मालुबाई तायडे, सत्यभामा सांगळकर, निर्मलाबाई चोपडे, मुकुंदा बोरले,निना वाडसे, शंकर वाडसे, शिवाजी पाटील, भास्कर सोनार सह असंख्य महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

