(अतिक मुक्ताईनगर )
सविस्तर असे की
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिवस म्हणून साजरा…
मुक्ताईनगर — शिक्षण हेच अज्ञानातून ज्ञानकडे व प्रगतीची दारे उघडणारे एकमेव महत्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या सहाय्यानेच बाबासाहेबांनी देशात क्रांती घडवून आणली. आणि एक आदर्श विद्यार्थी कसा असतो हे जगाला दाखवून दिले. म्हणून विद्यार्थ्यांनी महामानव डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा असे आवाहन उपशिक्षक शरद बोदडे यांनी केले.मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालयात आयोजित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून उपाशिक्षक शरद बोदडे हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक उपशिक्षिका वैशाली सोनवणे यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या शिक्षणप्रेरक विचारांवर आधारित मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनी ‘शिक्षण हेच खरे शस्त्र’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
श्री. बोदडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना डॉ.आंबेडकरांच्या मार्गावर चालण्याचे, त्यांचा आदर्श घेण्याचा संदेश दिला. ज्ञान प्राप्त करून समाजउन्नतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘मी ही डॉक्टर आंबेडकरांसारखा शिकेन’ अशी शपथ घेतली.
शाळा परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाशीक्षक शरद चौधरी यांनी केले तर आभार लिपीक नवल कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका श्रीमती कोसोदे, श्रीमती दुट्टे तसेच लिपीक भूषण पानपाटील, शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती विजया सोनवणे आणि स्वप्नील पाटील यांनी परिश्रम घेतले.

