वडगाव येथे रब्बी हरबरा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक संपन्न मौजे वडगाव ता.शहादा जि.नंदुरबार येथे कृषि विभागा मार्फत रब्बी हंगाम गाव बैठक घेऊन हरबरा ,गहु , रब्बी ज्वारी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी सुनील सुळे यांनी उपस्थित शेतकर्याना राज्यात आता रब्बी हंगामाला सुरुवात असुन रब्बीचे मुख्य पिक असलेले हरबरा ,गहू , ज्वारी पिकाचे पेरण्यांना वेग येतोय खरीप हंगाम नंतर व यंदाच्या अवकाळी व सततसच्या पावसामुळे जमिनीतुन अनेक किड आणी रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता असते.हे टाळण्यासाठी बियाणाचे पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करणे खुप गरजेचे असते बिजप्रक्रियामुळे .पिकाचे किड/रोगा पासुन संरक्षण होत उगवण चांगली होते उत्पादनातही वाढ होते. बिज प्रक्रिया म्हणजे काय सोपे भाषेत बिज प्रक्रिया म्हणजे लसीकरण कोणतेही रोग होऊ नये म्हणुन जसे आपण लस टोचुन घेतो त्याच प्रकारे जमिनीतुन होणारे रोग आणी किडीचे प्रार्दुभाव आपण रोखण्यासाठी पेरणीपुर्वी बियाणेवर प्रक्रिया करणे सेंद्रिय व रासायनिक बुरशीनाशके किटकनाशके यांचा द्रावणात लेप लावुन पेरणी करणे बिज प्रक्रियामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राचे बचत होते दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊन किड व रोगा पासुन मुक्त ठेवण्याचे काम बिज प्रक्रिया मुळे होते हरबरा प्रतिकिलो बियाण्यास 6 ग्राम ट्राॅयकोडर्माची बिजप्रक्रिया करावी ,रायझोबियम आणि स्पुरद विरघळवणारे जिवाणु 250 ग्राम प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावमध्ये मिसळावे बियाणे आर्धा तास सावलीत सुकवुन पेरणी करणे यामुळे मररोग ,नञ स्थिरकरण व स्पुरद उपलब्धेते साठी ,रब्बी ज्वारी 3 किलो मीठ 10 लिटर पाण्यात मिसळावे 30 टक्के मीठाचे द्रावण या द्रावणात बियाणे ओतावे , माहाडीबीटी अंतर्गत ट्राॅक्टर ,औजारे ,पाँकहाऊस ,कांदाचाळ ,शेडनेट,ठिंबक सिंचन योजना कागदपञे व हमीपञ ,बंधपञ,सामाईक खातेदार सम्मंञी पञासह सह अपलोड करणे आदि योजने बाबत माहिती दिली यावेळी सरपंच दिनेश पावरा ,उपसरपंच विजय सोनवणे , मा.पंचायत समिती सदस्य प्रकाश नावडे ,ग्राम पंचायत सदस्य पवन सुळे ,वन समिती अध्यक्ष दिलीप वळवी माजी सरपंच रमेश जाधव ,प्रगतिशील शेतकरी संजय वळवी ,सतोंष सुळे नानसिंग भिल , सायसिंग पावरा आनंद वळवी ,दिपक घोडसे आदी शेतकरी उपस्थित होते,

