मुंबई, 13 नोव्हेंबर — दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडक उपाययोजना राबविल्या आहेत. किनारपट्टी परिसर, बंदरं, जेटी, संवेदनशील ठिकाणं, बाजारपेठा, रेल्वे स्थानकं, बसस्थानकं आणि धार्मिक स्थळांवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे.
या मोहीमेअंतर्गत संशयास्पद वस्तू, वाहनं आणि व्यक्तींची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल, वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर किंवा 1093 या किनारी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचं आवाहन पोलिस प्रशासनाने केलं आहे.
जिल्हा पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सतत गस्त वाढविण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहून पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

