शिवसेना (उबाठा)चा आमरण उपोषणास पाठिंबा
मलकापुर:-:यशोधाम कॉलनीत यशोधाम पब्लीक स्कुल असुन स्कुलच्या 40 गाडया असुन एक गाडी दिवसभरात 4 ते 5 ट्रिपा मारत असते. त्यामुळे कॉलनीतील दोन्ही मुख्य रस्ते सकाळी 08.00 वा पासुन संध्याकाळी 05.00 वा. पावेतो खुप ट्राफिक असते त्यामुळे वाहतुकीस अडथडे निर्माण होतात त्यातच रस्ते कच्चे असुन स्कुलबसचे चालक हे भरधाव वेगाने वाहणे चालवितात त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत असुन त्या धुळीमुळे व प्रदुषणामुळे वयस्कर, सर्वसामान्य नागरीकांना व लहान मुलांना स्वसनाचे त्रास होतो. कॉलनीत मयत झाल्यास स्कुल बसमुळे अंत्ययात्रा उशीरा व शाळेच्या वेळे नुसार काढावी लागते. अशा अनेक कारणामुळे यशोधाम पब्लीक स्कुलचे स्कुल बसचा वाहतुक मार्ग कॉलनीतुन बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्या बाबतचे मागणकरीता रहिवासी नागरीकांनी दि. 15 जानेवारी 25 पासुन यशोधाम कॉलनी गेट बुलढाणा रोड येथे उपोषण केले होते. दि. 19 जानेवारी 25 25 रोजी आ. चैनसुख संचेती यांनी तत्कालीन तहसिलदार मलकापुर, यशोधाम पब्लीक स्कुलचे अध्यक्ष व शहर पोलीस निरीक्षक यांचे उपस्थितीत एका महिन्याचे आत पर्यायी रस्ता करून पर्यायी मार्गाने यशोधाम पब्लीक स्कुलचे बसेसची वाहतुन वळविण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे त्यावेळी आम्ही रहिवाशी नागरीकांनी उपोषण सोडले होते.
त्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर यशोधाम कॉलीचे पुढे बुलढाणा रोडने असलेल्या निंबारी ते वाकोडी शिवदांड येथुन पर्यायी रस्ता काढुन दि.26 मार्च 25 रोजी आ. चैनसुख संचेती यांनी सदर रस्त्याचे भुमी पुजन भुमी अभिलेख अधिकारी, नायब तहसिलदार, शासकीय कत्राटदार वाजीद कादरी यांचे उपस्थितीत रस्त्याचे मोजमाप करून रोडची आखणी केली होती. त्यानंतर आठ दिवसांनी सदर रस्त्याला लागुन शेती असलेले 1. बुरड 2. पदमसिंग ठाकुर यांनी रस्त्यामध्ये तार कम्पाउंड करून अतिक्रमण केले आहे. तेव्हा पासुन सदर पर्यायी रस्त्याबाबत कोणतेही काम झालेले नाही. सदरचे काम पेंडींग पडलेले आहे. सदर रस्त्यासाठी आ.संचेती यांचे निधीतुन निधी सुध्दा मंजुर झालेला आहे व शासकीय कत्राटदार वाजीद कादरी यांना टेंडरसुध्दा देण्यात आले आहे अशी माहिती आहे. सदरचे रस्त्याचे काम सुरू करणेसाठी आम्ही महसुल प्रशासन व आ.संचेती यांना वारंवार भेटुन रस्ता करणेबाबत व शाळेच्या वाहनांची वाहतुक वळविणे बाबत विनंती केली परंतु आज पावेतो काहीही झालेले नाही. सदरचा शिवदांडाचा सरकारी रस्ता असतांना दोन शेतक-यांनी अतिक्रमण करून तारकम्पाउंड केले आहे. ते त्वरीत काढुन सदर दोन्ही शेतक-यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी सदरचा रस्ता लवकरात लवकर पुर्ण करण्यात येवुन यशोधाम पब्लीक स्कुलच्या बसेस त्या मार्गाने वळविण्यात याव्यात सदरची कार्यवाही दि. 05 नोव्हेंबर 25 पावेतो करण्यात यावी अन्यथा आम्ही यशोधाम येथील महिला,पुरूष दि.06 नोव्हेंबर 25 रोजी पासुन यशोधाम गेट जवळील कॉलनीकडे जाणारा रस्ता येथे आमरण उपोषणास बसणार आहे तसेच महिला हया यशोधाम पब्लीक स्कुलचे जवळ रस्त्यावर साखळी उपोषण करणार आहेत. मुदतीत पर्यायी रस्त्याचे काम सुरू न केल्यास व पर्यायी मार्गाने वाहतुक न वळविल्यास महिला व पुरूष यांचे कडुन शाळेच्या बसची अडवणुक होवुन स्कुल बसचे नुकसान झाल्यास त्यास यशोधाम पब्लीक स्कुल समिती व प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता प्रशासनाने निवेदनाची दखल घेतल्याने आज दिनांक 6 नोव्हेंबर पासून यशोधाम मधील रहिवाशी नागरिक व महिलांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे यामध्ये अशोक सिंग राजपूत, रवी सोनोने, धर्मेंद्रसिंह राजपूत, शंकर पाटील, गजानन पालवे, अलका राजेंद्रसिंग हुशारे, रत्ना गजानन पालवे, कमलबाई दरबार सिंग राजपूत, विजया धर्मेंद्रसिंग राजपूत. पूजा गौतम खराटे, पार्वती हटकर, कौशल्या गावंडे, लताबाई मोरे,रुख्माबाई पाटील,वृंदा वराडे,नलिनी सरोदे, अर्चना मापारी, रेखा राजपूत, कल्पना पाचपोळ,उषा सोनवणे, नीलिमा राजपूत, कमलबाई ठाकूर, जयश्री वाघ, शिल्पा गवई, विमलबाई मापारी, शोभा राजपूत, शोभा उज्जैनकर, शुभम संजय काजळे, शिवरत्न सोनोने, अनुसया बघे, रूपाली गजानन खर्चे, राहुल खर्चे राहुल राजपूत, सरोदे, मोरे चोपडे, मुरेकर, मोघेल, सचिन मोहाळे, ज्ञानदेव पाटील, कमलाकर वराडे, सुरज वराडे, निखिल वराडे, प्रत्युप चौधरी, प्रविण पवार सह आदींनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या आमरण उपोषणाला शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, विभागप्रमुख चांद चव्हाण, मुस्ताक जमादार सह आदींनी भेट दिली असून यशोधाम नगर रहिवाशी नागरीकांची मागणी रास्त असून त्यांच्या पाठीशी शिवसेना (उबाठा) असून दि.08 नोव्हेंबरपर्यंत यशोधाम पब्लिक स्कूल बसेसचा पर्यायी मार्ग काढावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर सह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

