_ शहरात पाच बूथ क्रमांक संवेदनशील केंद्र. _ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार मतमोजणी.
संदीप जोगी मुक्ताईनगर…..
गेल्या दोन वर्षापासून प्रशासक असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक कामाचा आढावा तसेच मतदान केंद्र , मतमोजणी केंद्र व स्ट्रॉंग रूम ची पाहणी मुक्ताईनगर निवडणूक निरीक्षक बाळासाहेब पारधे यांनी केली. त्यांचे सोबत मुक्ताईनगर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गिरीश वखारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुभाष जानोरे , पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, निवासी नायब तहसीलदार निकेतन वाडे यांचे सह निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मतदान दोन डिसेंबर डिसेंबर रोजी असून मतमोजणी तीन डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मुक्ताईनगर येथे होणार असून येथेच बॅलेट युनिट साठी स्ट्रॉंग रूम करण्यात आलेली आहे.
मुक्ताईनगर शहरात एकूण 28 मतदान केंद्र असून यामध्ये शहरातील जिल्हा परिषद उर्दू मुला-मुलींची शाळा क्रमांक दोन मध्ये तीन मतदान केंद्र संवेदनशील असून यामध्ये प्रभाग क्रमांक 9, 10 , 11 मधील बूथ क्रमांक 9/1, 9/2, 10/1,11/1,11/2 ही संवेदनशील बूथ क्रमांक आहेत अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश वखारे यांनी दिली.
__ उद्या 21 नोव्हेंबर रोजी नाम निर्देशन पत्र दाखल माघारीच्या दिवशी निवडणुकीमध्ये रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतरच तर्क वितर्क लढवले जाऊ शकतात.

