संदीप जोगी… मुक्ताईनगर……,
मुक्ताईनगर येथील प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानव अधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संगठन तर्फे मौजे डोंगराळे ता. मालेगांव जि.नाशिक येथे घडलेली घटना जाहीर निषेध करण्यात आले व निवेदन देण्यात आले त्यात सविस्तर वृत असे की,मौजे डोंगराळे ता. मालेगांव जि.नाशिक येथे कु.यज्ञा जगदीश दुसाने या ४ वर्षाच्या चिमुकली वरती एक नराधमाने शारीरिक अत्याचार करुन तिची निघृनपणे हत्या करुन मानवतेला काळीमा फासला आहे.अशा क्रूर कर्म करणा-या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी सदरच्या खटल्यात पोस्को बाल अत्याचार कलमा लावुन फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. या गंभीर घटनेची आम्ही मानव अधिकार एंव महिला अपराध नियंत्रण संघटना तालुका शाखा मुक्ताईनगर तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच बालीकेच्या पीडीत कुंटुबास शासानाकडुन तातडीने आर्थिक मदत व योग्य भरपाई मंजुर करण्यात यावी सदर घटनेचा संपुर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला जात असुन विवीध संघटना ह्या रस्त्यावर उतरल्या असुन मोर्चा आंदोलन करीत आहे. व तिव्र संतापाची लाट पसरलेली असुन कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वास ढळत चालला आहे. सदरचे मागणीसाठी संघटनेचे वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर प्रशासन यांना संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांचे आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष मोहन मेढे यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवेदन सादर केले या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, तालुका सचिव हकीम चौधरी,तालुका अध्यक्ष भास्कर जंजाळकर, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर, तालुका कार्याधेक्ष बी. डी. गवई,शहर संघटक राजेंद्र वानखेडे, सदस्य रवींद्र शिरसोदे, शिवाजी कठोरे, सुपडू बोदडे, राजकुमार जैन, सौ. भारती लोखंडे, रामदास सुतार, इंद्रायणी भोई, आदी उपस्थित होते.

