(अतिक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर येथील खासदार संपर्क कार्यालय येथे भारतीय जनता पक्ष मार्फत नगरपंचायत निवडणूक २०२५ साठी भाजपा कडून इच्छुक उमेदवारांचा परिचय जिल्हा निवडणूक प्रभारी मंत्री श्री. संजय सावकारे व आमदार श्री. अमोल जावळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
भाजपा मार्फत ३८ लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी ३० कार्यकर्त्यांनी मुलाखत दिली. नगराध्यक्ष महिला पद राखीव असून, सदर पदासाठी नजमा इरफान तडवी, भावना ललित महाजन, निता प्रविण पाचपांडे, तहजीब बी सना जहांगिर खान, गायत्री विनोद सोनवणे व इतर इच्छुक आहे.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल जवरे, भाजपा तालुकाध्यक्ष (उत्तर) मोहन महाजन व भाजपा तालुकाध्यक्ष (दक्षिण) जयपाल बोदडे, तालुका सरचिटणीस श्री. पंकज कोळी, श्री. उमेश कोळी, श्री. अतुल महाजन, श्री. चंद्रकांत भोलाणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

