(अतीक खान मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर आगामी नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 11 मधून लोकप्रिय व उत्साही उमेदवार शेख शकील शेख मोसा यांनी आज अधिकृतपणे आपला नामांकन अर्ज नगरपंचायत कार्यालयात दाखल केला. निवडणूक अधिकारी तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केला.
नामांकन अर्ज दाखल करताना शेख शकील यांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने व उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळाली. स्थानिक विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे शेख शकील यांनी या प्रसंगी सांगितले.
वार्ड क्रमांक 11 मधील नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रवेशामुळे या प्रभागातील निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेख शकील शेख मोसा यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात उत्सुकता आणि राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.

