मुक्ताईनगर : तालुक्यात अवैध गांजा शेतीविरोधात पोलि सांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. निमखेडी शिवारात पोलिसांनी केलेल्या धाडीत तब्बल ३५ लाखांचा अवैध गांजा जप्त करण्यात आला. गेल्या दोन दिवसांतील ही तालुक्यातील दुसरी मोठी कारवाई आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, उपनिरीक्षक नयन पाटील यांनी संयुक्तरित्या ही धाड टाकली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढाकरे यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कालच मानेगाव येथे २३ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आज निमखेडी येथील कारवाईत आणखी ३५ लाखांचा मुद्देमाल हातात लागल्याने पोलिसांनी अवैध शेती करणाऱ्यांवर कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोनही प्रकरणांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये या घटनांची मोठी चर्चा सुरू आहे. दोन्ही ठिकाणी बेलदार आडनावाच्या व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती पुढे येत असली, तरी ते एकमेकांचे नातेवाईक आहेत का, याबाबत अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गाव परिसरात अशाच प्रकारची अवैध शेती होत असल्याची माहिती मिळताच ती तात्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून या गैरप्रकारावर प्रभावीपणे अंकुश ठेवता येईल.अशी माहिती मिळत आहे

